जिल्ह्यात वेल्हेतील घोल गाव बनले पहिले सांडपाणी मुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:33+5:302021-03-16T04:12:33+5:30

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक ...

Ghol village in Velha became the first sewage free village in the district | जिल्ह्यात वेल्हेतील घोल गाव बनले पहिले सांडपाणी मुक्त गाव

जिल्ह्यात वेल्हेतील घोल गाव बनले पहिले सांडपाणी मुक्त गाव

googlenewsNext

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव

सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक लाभही येथील ग्रामस्थांना झाला आहे. यामुळे गाव स्वच्छता, प्रदूषण, आणि डास मुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पाणी पातळी वाढण्यास देखील मोठी मदत होणार आहे. २८ जानेवारी रोजी ग्रामस्थांची बैठक घेऊन माहिती दिली गेली त्यासाठी लागणारी कागद पत्रे जमा होताच कामांना मंजुरी मिळाली व अवघ्या तीस दिवसांत ग्रामस्थांनी ही कामे पूर्ण केली. त्यामुळे लवकरच नाडेफ व गांडूळ खत प्रकल्पाचे काम हाती घेणार असल्याची माहीती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सांगितले की, शोषखड्डा हे जमिनी खालील बांधकाम आहे. त्याव्दारे पाण्याचा निचरा होण्यास पूर्ण मदत होते. पूर्वी निवळण केलेले पाणी, बाथरूम मधील व हातपंपातील पाणी शोषखडयात सोडण्यात येते. नंतर हे पाणी खडयातून आसपासच्या जमिनीत झिरपते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याबरोबरच पाण्याचा पुनः वापर व जलस्त्रोताची शाश्वतता राहण्यास मदत होते.या गावातील कामाची पाहणी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेट देत गावकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

वेल्हे तालुक्यातील घोल गावं सांडपाणी मुक्त झाल्याने तालुक्यातील इतर गावे याचा आदर्श घेत आहेत. यामध्ये वरोती, मंजाई आसनी ही गावे आघाडीवर आहेत तर संपूर्ण तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे.

विशाल शिंदे गटविकास अधिकारी

वेल्हे

सांडपाण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार तीनशे 33 कामे हाती घेण्यात आली आहेत.

२०२०-२१ मध्ये फेब्रुवारी अखेर २९९ कामे पूर्ण झाली.त्यामध्ये आंबेगांव-९,बारामती-१४, भोर-७५, हवेली-८,खेड-१,मावळ-१९२ यांचा समावेश आहे.

श्रीरंग चोरघे ,जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी

१५ मार्गासनी १

घोल(ता. वेल्हे) येथील शोषखड्ड्याची पाहणी करताना सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व इतर

Web Title: Ghol village in Velha became the first sewage free village in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.