घोरवडी योजना जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:25+5:302021-03-30T04:09:25+5:30
साधारण ६० लाख रुपये खर्चाचे हे काम असून यामध्ये ४ कि. मी. अंतरावर नविन जलवाहिनी होणार आहे. यामुळे सासवड ...
साधारण ६० लाख रुपये खर्चाचे हे काम असून यामध्ये ४ कि. मी. अंतरावर नविन जलवाहिनी होणार आहे. यामुळे सासवड नगरपालिकेला दररोज २५ लाख लिटर पाण्याची उपलब्धता होणार असून एप्रिल अखेर काम पूर्ण होणार आहे. ६७ एमसीएफटी क्षमतेचा घोरवडी पाझर तलाव असून बीगर सिंचन आहे यामुळे सासवडसाठी वर्षभर पाणी पुरवठा होईल असे मुख्याधिकारी विनोद जळक व पाणी पुरवठा प्रमुख, अभियंता रामानंद कळसकर यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, मनोहर जगताप, दिपक टकले, संजय चौरे, नगरसेविका पुष्पा जगताप, माया जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, नंदकुमार जगताप, परीसरातील शेतकरी कुमार जगताप, विलास जगताप, शिवाजी जगताप यांसह पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
--
२९ फोटो ओळी : सासवड पाणीपुरवठा सुरु
फोटोओळ :- सासवड पालिकेच्या घोरवडी योजनेच्या जलवाहिनी दुरूस्तीच्या शुभारंभ प्रसंगी आ संजय जगताप, मार्तंड भोंडे व पदाधिकारी