घोटवडे मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:11+5:302021-07-29T04:11:11+5:30

आदेशाचे पालन करून घोटवडे मंडलाधिकारी कार्यक्षेत्रातील गाव घोटवडे, भेगडेवाडी, मातेरेवाडी, गोदाबेवाडी, आमले वाडी येथे गाव कामगार तलाठी स्नेहल दिवटे, ...

Ghotwade Divisional Officer starts panchnama of excessive rain damage in the area | घोटवडे मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

घोटवडे मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

Next

आदेशाचे पालन करून घोटवडे मंडलाधिकारी कार्यक्षेत्रातील गाव घोटवडे, भेगडेवाडी, मातेरेवाडी, गोदाबेवाडी, आमले वाडी येथे गाव कामगार तलाठी स्नेहल दिवटे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर, कृषी सहायक काळभोर, रिहे तलाठी गद्रे, जवळ तलाठी आदमवाड, कातरखंडक तलाठी पवार मेम, चिखलगाव तलाठी चांदेकर, कोळवन तलाठी जमदाडे, भालगुडी तलाठी क्षिरसागर तसेच सदर कार्यक्षेत्रातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक हेही सदर नुकसान पंचनामे करताना दिसत आहेत.

पचनाम्यांमध्ये अतिवृष्टीमुळे १५%पेक्षा जास्त व पूर्ण पडझड झालेली घरे, घराचे पत्रे, घराची कौले उडून जाणे घरावर झाड पडणे व भिंत पडणे तसेच शेतातील बांध फुटणे व पिके वाहून जाणे इत्यादी बाबीचे पंचनामे सुरू असून सदर नुकसानग्रस्त खातेदाराने ठराविक फॉर्म भरून नुसानीचा फोटो व घराचा ग्रामपंचायत ८ अ चा उतारा आधारकार्ड बँक पासबुक झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे अशी माहिती घोटवडे मंडलआधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

Web Title: Ghotwade Divisional Officer starts panchnama of excessive rain damage in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.