घोटवडे ग्रामदैवत रोकडेश्वर यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:40+5:302021-04-29T04:08:40+5:30
घोडवडे गाव मुळशी तालुक्यात सर्वात मोठे गाव. आजूबाजूला तब्बल १२ वाड्या-वस्त्या असा मिळून सुमारे ५ किलोमीटर परिसर ...
घोडवडे गाव मुळशी तालुक्यात सर्वात मोठे गाव. आजूबाजूला तब्बल १२ वाड्या-वस्त्या असा मिळून सुमारे ५ किलोमीटर परिसर पसरलेल्या या गावाची लोकसंख्या सहा हजारांवर आहे. त्यामुळे रोकडेश्वर ग्रामदैवत यात्रेला दरवर्षी मोठी गर्दी असते. रोकडेश्वर, हनुमान, विठ्ठल-रखूमाई व गणपती अशी ४ दैवतांच्या मूर्ती परंपरेने चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिवशी रोकडेश्वर उत्सव साजरा होत असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाल्याने ना गर्दी होती ना भाविकांचा उत्साह. त्यामुळे यंदाची यात्रा सुनीसुनी ठरली. यात्रा रद्द झाली असली तरी महत्त्वाचे धार्मिक विधी मात्र मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला.
यात्रा रद्द झाल्यामुळे गावातील अर्थकारणावरही त्याचा मोठा परिणाम झाला. यात्रेच्या वेळी गावात थाटली जाणारी दुकाने, त्यानिमित्त ग्रामपंचायतीला मिळणारे कररुपी उत्पन्न, लोकांकडून यात्रेनिमित्त झालेल्या खरेदी-विक्रीमुळे अर्थचक्राला मिळणारी चालना, भारूड, तमाशाचे फड त्याच्या तिकीट विक्रीतून कलावंतांना मिळणारे उत्पन्न, कुस्त्यांच्या फड त्यातून पहिलवानांना मिळणारी प्रेरणा अशा अनेक गोष्टींवर कोरोना आणि लॉकडाऊनचा वाईट परिणाम झाला.