वडिलांच्या स्मृतीदिनी ग्रंथालयास स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:35+5:302021-03-16T04:12:35+5:30
कालकथित नामदेव सोनाजी मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कोणताही खर्च न करता सुमारे १०, ००० रुपयांचे मुल्य असलेली स्पर्धा ...
कालकथित नामदेव सोनाजी मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कोणताही खर्च न करता सुमारे १०, ००० रुपयांचे मुल्य असलेली स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त आणि महापुरूषांच्या विचारांवर आधारित पुस्तकांचे संच शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय ८६ पुस्तके आणि लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे वाचनालयास ८६ पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक तथा दलित स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजू धडे यांचे पुस्तकांचे संच सुपूर्द करण्यात आले. यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, ऍड. आकाश साबळे, प्रा. अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे , आर.पी.आय.चे जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, ऍड.नारायण ढावरे, अनिल ढावरे, ललेंद्र शिंदे, हनुमंत कांबळे, संजय शिंदे, बाळासाहेब मखरे, प्रा. संतोष लोखंडे, प्रा. बालाजी कलवले, शशिकांत मखरे, प्रा. संतोष घोडके, प्रा. प्रशांत घुले, अभिजीत अवघडे, अजय गायकवाड, नितीन गाडे, आकाश पोळ, सुरेश मखरे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी केले तर आभार रोहित ढावरे यांनी मानले.
इंदापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे ग्रंथालयात पुस्तके भेट देताना मान्यवर