बलुतेदार प्रतिष्ठानकडून ऑक्सिजन सिलिंडर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:42+5:302021-05-11T04:11:42+5:30
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ग्रामीण भागत मोठ्या रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी ...
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ग्रामीण भागत मोठ्या रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी कमी पडत असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. अनेकजण सढळ हाताने सरकारला मदत करत आहेत. या भागाची गरज लक्षात घेत उद्योजक योगेश पोपटराव चौधरी पाटील यांनी या परिसरातील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान यांच्या रग्णवाहिकांच्या माध्यमातून अनेक कोरोनाबाधित रग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाताना ऑक्सिजनचा सुविधाचा तुटवडा निर्माण झाला होतो. पर्यायाने रुग्णाला धोका अधिक प्रमाणात होतो. ही गरज लक्षात घेता बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रग्णवाहिक व्यवस्थापक संजय शेंबडे यांनी ऑक्सिजन सिलिंडर संदर्भात पाबळ येथील उद्योजक आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव योगेश पोपटराव चौधरी यांना कल्पना दिली. त्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ सुतार यांच्याकडे दोन दिवसांत स्वाधीन करत एक समाजिक उपयुक्तता आणि गरजेचे असणारे काम चौधरी यांनी केल असून, पाबळ ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
--
फोटो : १० शिक्रापूर पाबळ ऑक्सिजन वाटप
फोटो.. ऑक्सिजन सिलिंडर भेट देताना योगेश चौधरी सोबत बलुतेदारी क्रांती प्रतिष्ठान अध्यक्ष सोमनाथ सुतार.