गणेशमूर्तीसोबत दिली रोपांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:25+5:302021-09-14T04:14:25+5:30
समाजामध्ये वृक्षारोपणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत जावे यासाठी शासनाच्या वतीने दर वर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र, झाडांची देखभाल पाहिजे त्या ...
समाजामध्ये वृक्षारोपणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत जावे यासाठी शासनाच्या वतीने दर वर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र, झाडांची देखभाल पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे दर वर्षी वृक्षारोपण, मात्र खड्डा तोच ही परिस्थिती पाहावयास मिळते. त्यामुळे गणेशाच्या साक्षीने लावलेले रोपाची काळजी घ्यावी व जपणूूक करावी आणि गणेशाच्या प्रसाद म्हणून त्यांचे संगोपण केल्यास पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांची फळे चाखायला मिळणार आहेत.
माळशिरस गावचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र यादव पाटील म्हणाले की, वृक्षारोपणाचे महत्व पटवून देऊन वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात कसे होईल, याकडे हे तरुण वर्षभर काम करतात. गणपती विक्री करताना देखील वृक्षारोपण कसे करता येईल यासाठी गणपती मूर्तीबरोबर एक झाड भेट देऊन वृक्षारोपण करण्याचे अवाहन केले आहे.
-----
फोटो क्रमांक : १३ भुलेश्वर गणेशमूर्ती रोप भेट
फोटो ओळी : :माळशिरस येथे गणपती मूर्ती विक्रीबरोबर झाड भेट देताना तरुण.