लोकविश्व प्रतिष्ठानला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:54+5:302021-06-05T04:08:54+5:30
मोहन टाव्हरे व संतोष नायर यांच्या वतीने धोंडिभाऊ कुंडलिक टाव्हरे यांनी या दोन ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन मंचर येथे लोकविश्व ...
मोहन टाव्हरे व संतोष नायर यांच्या वतीने धोंडिभाऊ कुंडलिक टाव्हरे यांनी या दोन ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन मंचर येथे लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्याकडे सुपूर्त केल्या.
या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशिन्सचा उपयोग लोकविश्व प्रतिष्ठानच्या मोफत ऑक्सिजन काँसेंट्रेटर वाटप उपक्रमांतर्गत खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांना होणार असल्याची माहिती लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.
कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या मात्र बेड मिळण्यास विलंब होत असलेल्या कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत लोकविश्व प्रतिष्ठान व संतोष वायाळ मित्रपरिवारच्या माध्यमातून मर्यादित कालावधीच्या वापरासाठी मोफत ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन दिले जाते. तसेच कोरोना उपचार घेऊन घरी परतलेल्या मात्र शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांनाही लोकविश्वच्या माध्यमातून ऑक्सिजन काँसेंट्रेटर मोफत वापरासाठी दिले जाते. तीन आठवड्यांच्या कालावधीतच खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यांतील कोरोनाच्या ३१ गंभीर रुग्णांना लोकविश्वच्या मोफत ऑक्सिजन काँसेंट्रेटर वाटप उपक्रमाचा फायदा झाला असल्याची माहिती लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.
--
फोटो ०४ मंचर ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन
छायाचित्र मजकूर : लोकविश्व प्रतिष्ठानला ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन सुपूर्त करताना मोहन टाव्हरे व संतोष नायर यांच्या वतीने धोंडिभाऊ टाव्हरे.