गिरिप्रेमींच्या गिर्याराेहकांची दमदार कामगिरी ; 'माऊंट अमा दब्लम'वर यशस्वी चढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:29 PM2019-11-04T18:29:14+5:302019-11-04T18:31:10+5:30
गिरिप्रेमी या गिर्याराेहन संस्थेच्या दाेन गिर्याराेहकांनी 6812 मीटर उंच असलेल्या माऊंट अमा दब्लम या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
पुणे : नेपाळमधील खुंबू परदेशात स्थित माऊंट अमा दब्लम या 6812 मीटर उंच शिखरावर गिरिप्रेमीच्या गिर्याराेहकांनी यशस्वी चढाई केली आहे. हे शिखर चढाई करण्यासाठी माऊंट एव्हरेस्टपेक्षाही कठीण असल्याचे सांगितले जाते. विवेक शिवदे व जितेंद्र गवारे या अनुभवी गिर्याराेहकांनी 29 ऑक्टाेबर राेजी पहाटे शिखरमाथ्यावर यशस्वी चढाई केली.
शिवदे व गवारे हे दाेघेही अनुभवी गिर्याराेहक असून याआधी विविध शिखर माेहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. मे 2019 मध्ये दाेघांनीही गिरिप्रेमीच्या माऊंट कांचनजुंगा ईकाे इक्स्पीडिशन 2019 अंतर्गत जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगा वर यशस्वी चढाई केली हाेती. दाेघांनाही या माेहिमेसाठी उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले.
6812 मीटर उंच असलेले माऊंट अमा दब्लम नेमापळमधील खुंबू खाेऱ्यात वसलेले आहे. येथून जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट हे अत्यंत जवळ आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वाटेवर पूर्व दिशेला माऊंट अमा दब्लम उभे असून ट्रेकच्या वेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. चढाई मार्गावर कॅम्प 1 ते कॅम्प 3 च्या दरम्यान 60 ते 70 अंश काेनाचा तीव्र खडा चढ आहे. येथे चढाई करताना आईस क्लायंबिंग, राॅक क्लायंबिंगसारख्या गिर्याराेहणातील काैशल्यपूर्ण तंत्रांच्या आधारे चढाई करावी लागते. कॅम्प 3 नंतर शिखरमाथ्यापर्यंत खडा चढ अत्यंत तीव्र हाेत जाताे व येथे राॅक क्लायंबिंगमध्ये प्रविण असलेल्या गिर्याराेहकांनाच चढाई करणे शक्य हाेते.