कोरोनासंकटात ‘गिरिराज’च्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:52+5:302021-08-20T04:14:52+5:30
बारामती: कोरोना संकटात ‘गिरिराज’च्या आरोग्यदूतांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे कोरोना संकट निवारणास मोठी मदत झाली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ...
बारामती: कोरोना संकटात ‘गिरिराज’च्या आरोग्यदूतांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे कोरोना संकट निवारणास मोठी मदत झाली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भोईटे हे महाराष्ट्राचे महाआरोग्यदूत असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
हृदयरोगतज्ज्ञ व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे आणि सचिव निर्मला भोईटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लंके यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार लंके म्हणाले की, कोरोना महामारीतून सावरण्यासाठी आरोग्यदूतांनी मोठी कामगिरी केली. ग्रामीण स्तरावर डॉक्टरांनी गेली ३० वर्षे अव्याहतपणे ३४९ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्याचा लाखो रुग्णांना फायदा झाला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या मोफत हृदयरोग शिबिरात ३१५ अॅन्जिओग्राफी, ८२ ॲन्जिओप्लास्टी, व ४१ कार्डियाक बायपास व इतर अशा ४५० कार्डियाक प्रोसिजर्स करून विक्रम रचल्याचे लंके म्हणाले. त्यामुळे डॉ. भोईटे हे महाराष्ट्राचे महाआरोग्यदूत आहेत. संस्थेच्या सचिव व डॉ. भोईटे यांच्या पत्नी निर्मला भोईटे यांची मोलाची साथ असल्याने हे शक्य झाले असेही ते म्हणाले.
नजीकच्या काळात सुसज्ज व अद्ययावत असे १५० बेडचे मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू करत आहोत, असे डॉ. रमेश भोईटे यांनी जाहीर केले. या वेळी आमदार लंके, डॉ. बाळासाहेब कावरे, अभियंते फावडे, डॉ. विवेक भोईटे यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य व्यवस्थापक प्रशांत भोसले यांनी गिरिराज हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, डॉ. अमृता वाघचौरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सुनंदा पवार, किशोर भापकर, चंदाशेठ वाघोलीकर, गिरिजा भोईटे, गौरी भोईटे ,सुपुत्र डॉ. राहुल भोईटे यांनी शुभेच्छा दिल्या.
आमदार नीलेश लंके यांचा सन्मान करताना डॉ. रमेश भोईटे, निर्मला भोईटे.
१९०८२०२१ बारामती—०८