गिरीश बापट आजारी असतानाही पोटनिवडणुकीच्या प्रचारात; शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:47 PM2023-02-17T15:47:45+5:302023-02-17T15:47:55+5:30

गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्यानं भाजपवर चौफेर टीका

Girish Bapat campaigning for the by-elections despite his illness Sharad Pawar said... | गिरीश बापट आजारी असतानाही पोटनिवडणुकीच्या प्रचारात; शरद पवार म्हणाले...

गिरीश बापट आजारी असतानाही पोटनिवडणुकीच्या प्रचारात; शरद पवार म्हणाले...

Next

पुणे : खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्यानं भाजपवर चौफेर टीका होत आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, "त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे"

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहित होतं असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर सुरुवातीला शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं, पण आज त्यांनी यावर भाष्य केलं असून "पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे की, इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन फडणवीस यांच महत्व वाढवायचं नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. मी ऐकलं की मंगळवारी याचा निर्णय येऊ शकतो. बघू आता मंगळवारी काय होतं ते इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार का याबाबत विचारलं असता, कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका असे सांगितले. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी (कसबा आणि चिंचवड) जावं लागेल, असे ते म्हणाले.

ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली

आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावरून त्यांनी आसाम सरकारवर टीका केली. 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत. हे संपूर्ण देशाला माहीत आहे. असं असतानाही ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याविषयी काय सांगायचं? असेही शरद पवार म्हणाले.

Web Title: Girish Bapat campaigning for the by-elections despite his illness Sharad Pawar said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.