उमेदवारी जाहीर हाेताच गिरीश बापट यांचं भाजप कार्यलयात वाजत गाजत स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:47 PM2019-03-23T13:47:11+5:302019-03-23T13:49:04+5:30
पुण्याच्या जागेवर भाजपाकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे वाजत गाजत स्वागत भाजप कार्यालयात करण्यात आले.
पुणे : पुण्याच्या भाजपाच्या जागेवरुन काेणाला उमेदवारी जाहीर हाेणार, याची उत्सुकता असताना काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पुण्याच्या जागेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी बापट यांनी शिवाजी महाराजांच्या काेथरुड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपाच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी वाजत गाजत बापट यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पुणे का नेता कैसा हाे गिरीश बापट जैसा हाे अशा घाेषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, महापाैर मुक्ता टिळक, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, विजय काळे, माधुरी मिसाळ आदी उपस्थित हाेते.
पुण्याच्या जागेवर भाजपाकडून अनेकजण उत्सुक हाेते. त्यात विद्यमान खासदार अनिल शिराेळे, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले त्याचबराेबर भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे हे देखील उत्सुक हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या यादीत पुण्याच्या जागेवर बापट यांना उमेदवारी देण्यात आली. आज त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी माेठ्याप्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी भाजप कार्यालयाच्या बाहेर हाेती. उमेदावारी दिल्याबद्दल बापट यांनी आनंद व्यक्त केला असून भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
बापट म्हणाले, पुणे शहराच्या उमेदवारीसाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल भाजपाच्या नेतृत्त्वाचे आभार. त्याचबराेबर मित्र पक्षांचे सुद्धा धन्यावाद. निवडणूकीत प्रत्येक भागामधून एकच उमेदवारी असते. पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत, असतात आणि राहतील. त्यातून एकाचीच निवड करावी लागते. याचा अर्थ दुसरा कमी आहे, असे नाही. पुणे शहरात अनेकजण उमेदवारीसाठी उत्सुक हाेते. ते सर्व सक्षम उमेदवार हाेते. निवडूण येण्याच्या शक्यतेवर आणि गुणवत्तेच्या आधारे पक्षनेतृत्व काेणाला उमेदवारी द्यायची याचा विचार करत असते. पुणे शहराची लाेकसभा आम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकणार आहाेत. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून जी विकासाची कामं सुरु केली, त्यातून आम्ही सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवला आहे. गेली 15 वर्षे केवळ घाेषणा हाेत हाेत्या. मेट्राेचा प्रश्न दुर्लक्षित हाेता, ताे मार्गी लावला. पुण्यातले प्रश्न कागदावर नाहीतर रस्त्यावर दिसू लागले आहेत. पाणी, स्वच्छतेचे, नदी सुधारण्याचे प्रश्न साेडविण्यात येत आहेत. अनेक याेजना राबविण्यात आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार असा आत्मविश्वास मला आहे.