ती' चे स्वागत वाजतगाजत व रंगोळी पायघड्या घालून !(व्हिडीओ)
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:09 PM2019-09-09T21:09:59+5:302019-09-09T21:14:48+5:30
ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा कुतूहलाचा विषय झाला.
पुणे (राजगुरूनगर): ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा कुतूहलाचा विषय झाला.
राजगुरूनगर येथील समीर थिगळे यांच्या घरातील ही घटना. या कुटुंबात मुलगीने पंचावन्न वर्षात जन्म घेतला नव्हता. त्यामुळे मुलीची ओढ काय असते त्या कुटुंबाने अनुभवली. मुलगी घरात सोनपावलांनी यावी ही कुटुंबातील सर्वांचीच इच्छा. हे स्वप्न पूर्ण झाले तेही तब्बल पंचावन्न वर्षांनी! मग काय आनंदाला भरते आले आणि चिमुकलीचे स्वागत भन्नाट झाले. समीर व नीलिमा या दाम्पत्यास झालेली मुलगी त्यांच्या कुटुंबियात पंचावन्न वर्षानंतर मुलगी म्हणून जन्मास आली. त्यामुळे तिच्या जन्माचे अप्रूप साऱ्या कुटुंबास झाले. त्या आनंदात मग महिला फुगड्या खेळत व बाळाच्या आगमनावेळी रांगोळीच्या पायघड्या घालीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. हे मुलीचे स्वागत मात्र कौतुकाचा विषय ठरला आहे.