तरुणीची आत्महत्या ; तरुणाला केली अटक

By Admin | Published: July 27, 2014 12:24 AM2014-07-27T00:24:37+5:302014-07-27T00:24:37+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

The girl commits suicide; Youth has been arrested | तरुणीची आत्महत्या ; तरुणाला केली अटक

तरुणीची आत्महत्या ; तरुणाला केली अटक

googlenewsNext
पुणो : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सोमवार्पयत पोलीस कोठडी सुनावली. 
निमित नरेंद्र गर्ग (वय 23, रा. वंडर सिटी, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. अर्चिता विनयमोहन त्रिपाठी (वय 2क्, रा. न्यान्सी लेक होम, कात्रज) हिने 16 जून रोजी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनयमोहन त्रिपाठी यांनी फिर्याद दिली होती. अर्चिता भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला शिकत होती. गेल्या तीन वर्षापासून ती पुण्यात राहत होती. अर्चिता आणि निमित हे एममेकांचे मित्र होते. ते काही काळापासून एकत्र राहत होते. अर्चिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निमित हा अर्चिताला त्रस देत होता. त्यांच्यामध्ये सतत भांडणो होत होती. निमितनेच तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 9 जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, अर्चिताच्या कुटुंबीयांनी  ‘लोकमत’कडे आपली व्यथा मांडली होती. 
अर्चिताच्या आत्महत्येच्या तपासातील ढिलाईबाबत  ‘लोकमत’ ने शनिवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या या दणक्यामुळे पोलिसांना जाग आली आणि त्यांनी निमितला तातडीने अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील पी. एस. माने यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. 

 

Web Title: The girl commits suicide; Youth has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.