पुणे : पालक पेरेंट मीटिंगसाठी गेले असताना मुलीची चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 09:11 PM2022-07-08T21:11:03+5:302022-07-08T21:13:58+5:30

पुणे शहरातील धक्कादायक घटना...

girl committed suicide by jumping from the 14th floor while her parents were attending a parent meeting | पुणे : पालक पेरेंट मीटिंगसाठी गेले असताना मुलीची चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पालक पेरेंट मीटिंगसाठी गेले असताना मुलीची चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Next

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. आई वडील घरात नसताना एका शाळकरी मुलीने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हडपसर परिसरातील उच्चभ्रू नवीन अमनोरा पार्क परिसरात ही घटना घडली. 

अवंतीका कुलाशेखर (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अवंतिकाचे आई-वडील आज पालक मेळाव्यानिमित्त ती शिक्षण घेत असलेल्या संस्थेत गेले होते. तर, तिचा लहान भाऊ देखील शाळेत गेला होता. त्यावेळी ती घरी एकटीच होती.

यादरम्यान, सकाळी आई-वडील पालक मेळाव्यावरून परत आले. ते लिफ्टने जात असतानाच तिने घराचा आतून दरवाजा बंदकरून चौदाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी येथे धाव घेतली. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: girl committed suicide by jumping from the 14th floor while her parents were attending a parent meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.