मुलींनी बांधल्या पोलिसांना राख्या, नाते सामाजिक बांधिलकीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 01:41 AM2018-08-26T01:41:40+5:302018-08-26T01:42:19+5:30
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व
वाकड : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाºयांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. थेरगाव येथील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रज्ञा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वाकड पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राखी बांधण्यामध्ये वैष्णवी साळवे, पल्लवी मिसळे, स्वाती गरडे, मनाली भालेराव, कार्ती साळवे, काजल चव्हाण, राणी गोडाबे, वैशाली राठोड, वर्षा फुलावळे, पूनम कदम, देवतीन गायकवाड, कांचन साळवे, गोरी कांबळे, सपना पवार या विद्यार्थिनींचा सहभाग होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, सहायक निरीक्षक तानाजी भोगम, उपनिरीक्षक रमेश केंगार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व संस्थेचे खजिनदार बुद्धभूषण गवळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सहशिक्षिका मंगला सपकाळे, चंद्रकला काळोखे, संगीता रोकडे, प्रज्ञा सोनवणे यांनी नियोजन केले. राखी बांधल्यानंतर पोलीस काकांनी सर्व विद्यार्थिंनीना भेट म्हणून खाऊचे वाटप केले.
जवानांना बांधल्या राख्या
पिंपळे गुरव : देवकर पथ, येथील एम. जी. देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये बालचमूंनी जवानांनसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. एक सामाजिक उपक्रम व सैनिकांच्या प्रती आपले ऋण व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांतर्फे हजर असलेले प्रतिनिधी मेजर रावसाहेब ढोले व मेजर प्रमोद काळे यांना औक्षण केले. नंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कावेरी सावंत व ममता चौधरी या विद्यार्थिनींनी बांधल्या़ यामुळे मुले भारावून गेली.
सीमेवरील जवानांनमुळे आज संपूर्ण देश सुरक्षित आहे़ आपत्कालीन परिस्थितीत देशवासीयांसाठी जवानांचे योगदान खूप मोठे आहे़ त्यामुळेच जवान तुझे सलाम....असे मनोगत माधुरी बांद्रे यांनी व्यक्त केले. मेजर रावसाहेब ढोले यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक प्रकारची स्फूर्ती येते. देशातील आमच्या भगिनी व देशवासीय आमच्या बरोबर असल्याचे वाटते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे व या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी शाळेतर्फे जवानांनसाठी या प्रतिनिधींकडे राख्या देण्यात आल्या. संस्थापक रामदास देवकर व शांताबाई देवकर यांच्या हस्ते या दोन्ही सैनिक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी या सैनिक प्रतिनिधीचे आभार मानले. या वेळी विविध संस्थांच्या वतीने वाहतूक पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच विविध शाळांंमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रमही झाला. काही शाळांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना औक्षण करून राख्या बांधल्या. या वेळी रक्षाबंधनाचे महत्व सांगण्यात आले. शाळेत असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.