चुकून गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू

By admin | Published: October 3, 2015 01:05 AM2015-10-03T01:05:24+5:302015-10-03T01:05:24+5:30

स्तनपान करीत असताना आईच्या साडीच्या पदराचा गळ््यावर दाब पडल्याने तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

Girl's death due to mistake | चुकून गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू

चुकून गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू

Next

पुणे : स्तनपान करीत असताना आईच्या साडीच्या पदराचा गळ््यावर दाब पडल्याने तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जगताप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दि. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित २२ वर्षीय विवाहिता गर्भवती असताना पतीसह तीनचाकी टेम्पोतून रुग्णालयात जात होती. मात्र, वाटेतच ती प्रसूत झाली. त्यानंतर ते दवाखान्यात न जाता मुलीला घरी घेऊन आले. दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता मुलगी खूप रडू लागल्याने आईने दूध पाजून तिला झोपवले. त्यानंतर दोन तासांनी ही मुलगी बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. या वेळी पुढील तपासासाठी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला होता.
त्या वेळी सहकारनगर पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंंद करण्यात आली होती. ससून रुग्णालयाकडून राखून ठेवलेल्या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी प्राप्त झाला. या अहवालामध्ये तीन दिवसांच्या मुलीचा गळ््यावर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. स्तनपान करीत असताना मुलीच्या गळ््याभोवती आईच्या पदराचा दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मुलीच्या आईवर कलम ३०४ अअन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Girl's death due to mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.