मुलींनी लुटला रानमेव्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 01:41 AM2016-03-13T01:41:33+5:302016-03-13T01:41:33+5:30
रानमेव्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीची आतुरतेने वाट बघायचो. वडाच्या पारंब्यांना लटकून झोके घेत तोडलेल्या चिंचा, दगडं मारून तोडलेल्या कैऱ्या, ऊस चोरून खाताना मागे लागलेले राखणदार
पुणे : रानमेव्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीची आतुरतेने वाट बघायचो. वडाच्या पारंब्यांना लटकून झोके घेत तोडलेल्या चिंचा, दगडं मारून तोडलेल्या कैऱ्या, ऊस चोरून खाताना मागे लागलेले राखणदार, अशा रानमेवा खाण्यासाठी बालपणात केलेल्या गमतीजमती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी सांगितल्या. निमित्त होते वीर शिवराज मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ हिंदू महिलाश्रमातील मुलींसाठी आयोजित केलेल्या रानमेव्याचा आनंद लुटण्याच्या कार्यक्रमाचे. या वेळी डॉ. जोशी यांच्यासोबत गप्पांचे आयोजन करण्यात आले.
महिलाश्रमाच्या पूनम तिवारी, मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, गंधाली शहा, नरेंद्र व्यास, चंद्रशेखर पवार, अक्षय पानसरे, राजेंद्र भोसले, अमोद शुक्ला, सतीश चव्हाण उपस्थित होते.
किरण सोनिवाल म्हणाले, ‘‘ऋतुमानाप्रमाणे निसर्गदेखील आपल्यासाठी निरनिराळ्या फळांचा नजराणा पेश करीत असतो. आपण सगळे या रानमेव्याचा आस्वाद घेतोच; परंतु अनाथ मुलांनादेखील रानमेव्याचा आस्वाद घेता यावा, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.’’
(प्रतिनिधी)