जिल्ह्यात मुलींची आघाडी

By admin | Published: May 27, 2015 11:13 PM2015-05-27T23:13:51+5:302015-05-27T23:13:51+5:30

राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही बारावी परीक्षेत मुलींनीच आघाडी घेतली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७ टक्क्यांनी जास्त आहे.

Girls lead in the district | जिल्ह्यात मुलींची आघाडी

जिल्ह्यात मुलींची आघाडी

Next

पुणे : राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही बारावी परीक्षेत मुलींनीच आघाडी घेतली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७ टक्क्यांनी जास्त आहे. जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर दौंंड तालुका शेवटच्या स्थानावर आहे.
बारावीच्या निकालात पुणे विभागीय शिक्षण मंडळ राज्यात पाचव्या स्थानावर आहे, तर विभागात पुणे जिल्हा तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. जिल्ह्याचा नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९१.३८ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीचा निकाल ९०.४९ टक्के होता. जिल्ह्यात एकूण १ लाख ७ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ४७ हजार २९० मुली आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण निकालात मुलींची टक्केवारी ९५.१५ तर मुलांची ८८.१५ इतकी आहे. जिल्ह्यातील ४९ हजार ७०० मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षा देणाऱ्या मुलांची संख्या मुलींपेक्षा सुमारे १० हजाराने अधिक आहे.
जिल्ह्यात आंबेगाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला आहे. या तालुक्यातील ९५.६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दौंड तालुक्याचा सर्वात कमी ८९.१८ टक्के निकाल लागला आहे. पुणे शहराचा एकूण निकाल ९३.४८ टक्के लागला असून, पिंपरी-चिंचवडमधील ९४.५६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याची निकालाची टक्केवारी सुमारे १ टक्क्याने वाढली आहे. मार्च २०१४ च्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.(प्रतिनिधी)

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
आंबेगाव : ९५.६५
बारामती : ९४.०३
भोर : ९३.५२
दौंड : ८९.१८
हवेली : ९३.१७
इंदापूर : ९२.८२
जुन्नर : ९१.५२
खेड : ९१.६०
मावळ : ९३.२०
मुळशी : ९३.९०
पुरंदर : ९४.५९
शिरूर : ९३.९३
वेल्हा : ९६.९९

९१ महाविद्यालये शंभर नंबरी
४जिल्ह्यातील सुमारे ५०० कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ९१ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २६ शाळा आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील १८ शाळांतील सर्व नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
४जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ८, हवेली व इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी ७, जुन्नर, पुरंदर व
मावळमधील प्रत्येकी ४, आंबेगाव, भोर व मुळशीमधील प्रत्येकी ३, बारामतीतील २ तर खेड व वेल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तसेच, मोबाईलवर अनेकांनी निकाल जाणून घेतला. समाधानकारक गुण मिळाल्याचे समजताच अनेकांनी टाळ्या आणि आलिंगन देत मस्तपैकी सेलिबे्रशन केले.

Web Title: Girls lead in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.