सांस्कृतिक शहरात मुली असुरक्षित, ठिकठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:10 AM2021-09-19T04:10:20+5:302021-09-19T04:10:20+5:30

स्टार ११८५ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरातून निघून गेलेल्या मुलीला पुणे स्टेशन येथून घरी सोडण्याचे व पैसे देण्याचे ...

Girls unsafe in cultural cities, haunted by rodeos in places | सांस्कृतिक शहरात मुली असुरक्षित, ठिकठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे

सांस्कृतिक शहरात मुली असुरक्षित, ठिकठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे

googlenewsNext

स्टार ११८५

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरातून निघून गेलेल्या मुलीला पुणे स्टेशन येथून घरी सोडण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. मध्यरात्रीही दुचाकीवरून बिनधास्त एकटी जाऊ शकेल, अशा सुरक्षित पुणे शहरात अशा काही घटना एका मागोमाग घडल्याने घरातून बाहेर पडलेली मुलगी सुरक्षित परत येईल का? अशी चिंता व्यक्त होत आहे. शहरात अनेक ठिकाणी रोडरोमिओंचे अड्डे असल्याचे दिसून आले आहे. तेथून मुली, तरुणी जात असताना त्यांची छेडछाड होण्याचे प्रकार वारंवार होत असतात.

पुणे शहर हे शैक्षणिक हब असल्याने, येथे राज्यातूनच नाही तर देश-परदेशांतून शिक्षणासाठी तरुण-तरुणी येत असतात. त्यामुळे अशा तरुण-तरुणींचे भेटण्याची काही महत्त्वाची ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. त्याच ठिकाणी प्रामुख्याने असे प्रकार होताना आढळून येतात.

भीतीमुळे तक्रार देण्यास येत नाहीत पुढे

शहरात प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी पथक असते. दोन पोलीस ठाण्यात मिळून एक गाडी त्यांच्यासाठी दिलेली आहे. या पथकातील महिला शहरातील निर्जनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत असतात. अनेकदा बस स्टँड, गर्दीच्या ठिकाणी रोडरोमिओ तरुणींचा पाठलाग करत असतात. गस्त घालणाऱ्या या दामिनींच्या ते लक्षात येताच, त्या जाब विचारतात. तरुणीला विश्वासात घेतात. तेव्हा संबंधित तरुण तिचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करीत असल्याचे ती सांगते. पण तक्रार देण्यास घाबरत असते.

दामिनी पथकाकडून पूर्वी शाळा, महाविद्यालयात जाऊन मुली, तरुणींचे प्रबोधन केले जात होते. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यायालये बंद आहेत. त्यामुळे या वेळात दामिनी पथक गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत असतात.

शहरातील तरुण-तरुणीचे अड्डे

शनिवारवाडा चौपाटी, झेड ब्रिज, बालगंधर्व पूल, वर्तक बागेशेजारील घाट, फर्ग्युसन रस्ता - वैशाली हॉटेलशेजारील गल्ली, बीएमसीसी परिसर, एमसीसी परिसर, जे.एम. रस्ता, नदीपात्र, एस. एम. जोशी ब्रिज, भिडे पूल चौपाटी, हॉंगकॉंग लेन, करिष्मा सोसायटी लेन, कोथरूड सिटी प्राईड परिसर, टिळक रस्ता - हिराबाग चौक, एस.पी. बिर्याणी, प्रमुख रस्त्यावरील चहाभुवन, डीपी रस्ता, खडकी बाजार, औंध नदीपात्र,

छेडछाड झाल्यास संपर्क साधा

महिलांना संकटकाळी मदत व्हावी, यासाठी १०९१ हा महिला हेल्पलाईनचा नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर कॉल केल्यास तातडीने महिलांना मदत मिळू शकते. तसेच १०० नंबरवरही तुम्ही कॉल करू शकता.

महिला हेल्पलाईनवर दररोज साधारण ५ ते ६ कॉल असतात. कॉल येण्याचे प्रमाण साधारण रात्री ८ नंतर असते.

Web Title: Girls unsafe in cultural cities, haunted by rodeos in places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.