गाळ्यासाठीची रक्कम परत द्या!

By admin | Published: February 25, 2016 04:06 AM2016-02-25T04:06:52+5:302016-02-25T04:06:52+5:30

नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या ६० गाळ््यांपैकी ४५ गाळेधारकांनी एकत्रित येऊन गाळ््यासाठी घेतलेली प्रत्येकी १ ते २ लाख रुपयांची रक्कम परत करावी, अन्यथा

Give back the amount for the car! | गाळ्यासाठीची रक्कम परत द्या!

गाळ्यासाठीची रक्कम परत द्या!

Next

नारायणगाव : नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या ६० गाळ््यांपैकी ४५ गाळेधारकांनी एकत्रित येऊन गाळ््यासाठी घेतलेली प्रत्येकी १ ते २ लाख रुपयांची रक्कम परत करावी, अन्यथा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने स्थानिक नेता अडचणीत आला आहे़ दमदाटी दशहत करून वसुली केलेली रक्कम गाळेधारक एकत्र आल्याने आता त्यांना परत द्यावी लागणार आहे़
नारायणगाव बसस्थानकालगत ६० गाळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत असल्याचे नुकतेच मोजणीत निश्चित झाले आहे़ हे गाळे बेकायदेशीर असल्याने कोणत्याही क्षणी हे गाळे काढून टाकण्याची शक्यता असल्याने गाळेधारकांनी हे गाळे जाणार, ही मानसिकता कायम ठेवून स्थानिक नेत्याने दहशत निर्माण करून प्रत्येक गाळ््यापोटी १ ते २ लाख रुपये घेतलेले आहेत़ ही रक्कम घेताना त्यांने आपल्या पतसंस्थेचा वापर केला़
या पतसंस्थेत या गाळेधारकांचे खाते उघडण्यास लावले़ त्यानंतर ठरलेल्या रकमेनुसार पहिला हप्ता १ लाख, तर काहींची पूर्ण रक्कम २ लाख अशी पतसंस्थेतील खात्यावर जमा करण्यास लावले़
त्यानंतर गाळेधारकांकडून सेल्फ चलन भरून घेऊन ही रक्कम गाळेधारकांनीच काढली, असे भासवून या नेत्याने ती रक्कम काढून घेतलेली आहे़ या रकमेपोटी गाळे
सुरक्षित ठेवण्याची हमी या नेत्याने घेतली होती.
काही गाळेधारकांनी ५० हजार रुपये जमा केल्याने या गाळेधारकांनी पूर्ण रक्कम जमा करावी व गाळेधारकांवर दहशत निर्माण व्हावी, यासाठी बाळू व शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्नदेखील या नेत्याने केला़
त्यामुळे या गाळेधारकांनी नेत्याला दिलेली रक्कम परत मिळावी, यासाठी ४५ गाळेधारक एकत्रित
आले आहेत़ या गाळेधारकांपैकी अनेकांनी कर्ज काढून या नेत्याला रक्कम दिलेली आहे़
आता गाळे जाणारच, अशी मानसिकता झाल्याने फुकट व दहशतीने घेतलेली रक्कम परत मिळावी, यासाठी गाळेधारकांनी एकत्रित येऊन या नेत्याची भेट
घेतली व घेतलेली रक्कम परत करावी; अन्यथा आम्हाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागेल. (वार्ताहर)

जुन्नर येथील सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा
इशारा गाळेधारकांनी
दिला आहे़ या नेत्याने सामंजस्याची भूमिका घेऊन गाळेधारकांकडून घेतलेली रक्कम परत देण्याचे कबूल केले आहे. काही दिवसांची मुदत द्या, मी तुमची रक्कम परत करतो, असे सांगून मुदत मागितलेली आहे.

बस स्थानकालगतचे ६० गाळे अनधिकृत
नारायणगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे़ नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य महामार्ग क्ऱ १११ ची मोजणी करून हद्द कायम केलेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हद्दीमध्येच बस स्थानकालगतचे ६० गाळे अनधिकृतपणे असल्याचे निष्पन्न झाले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभाग हे अनधिकृत बांधकाम ठेवण्याची शक्यता नसल्याने या गाळेधारकांची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे़

Web Title: Give back the amount for the car!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.