दुचाकीस्वारांवर काळाचा घाला; तीन अपघातात चौैघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:58 AM2019-02-22T00:58:32+5:302019-02-22T00:58:54+5:30
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर पुन्हा दुर्घटना : हेल्मेट नसल्याचा फटका
नीरा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. नीरा-वाल्हा दरम्यानच्या अरुंद रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. गुरुवारी अकराच्या सुमारास भरधाव पिकप टेंपोने दोन मोटारसायकललींना धडक देऊन पसार झाला. एक मोटारसायकल चालक जखमी असून एका चालकाचा उपचारादरम्यान व मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला आहे.
पालखी मार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यान जेऊर फाट्या शेजारी दोन मोटारसायकलींना भरधाव पिकप टेंपोची जोरदार धडक दिली. नीरा बाजुने जेजूरीकडे निघालेला भरधाव टेंपोने नीरेहुन जेऊरकडे निघालेल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२ जे.एच. ७१२० ला मागुन जोरदार धडक दिली. या मोटारसायकली वर मागे बसलेले रामदास चव्हाण (वय६५) जागीच ठार झाले. चालक विलास जाधव (वय ४५) गंभीर जखमी झाले होत. त्यांचा पुणे येथील रुग्णालयात संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघे पुरंदर तालुक्यातील जेऊर गावातील रहिवासी आहेत. नंतर जेजुरीहुन नीरा बाजुकडे निघालेल्य मोटारसायकलल क्रमांक एम.एच.१२ एल.डी. ७५६० ला समोरासमोर धडक दिली. या मोटारसायकलचे चालक मोहन वाघमारे (वय५०) रा. खेड (ता.खंडाळा) जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून खाजगी रुग्णालयात पुढिल उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनास्थळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी तात्काळ भेट दिली.
टेम्पोच्या धडकेने एक जण ठार
नगर-कल्याण महामार्गावर राजुरी परिसरात दुचाकी व मालवाहू टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आळेफाटा पोलिसांचे वृत्त असे : दत्तात्रय मंजाभाऊ औटी (वय ५२, रा. राजुरी, ता. जुन्नर) राजुरी बाजूने आळेफाटाकडे दुचाकीवरून (एमएच १४ इआर १६५१) जात असताना नगर-कल्याण महामार्गावर राजुरी बसस्थानकासमोर कल्याण बाजूने नगरकडे जात असलेला मालवाहू टेम्पो (एमएच १४ एआर २६०२) विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीवर धडकला. या अपघातात दत्तात्रय औटी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. राजुरी येथील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेत ते सचिव म्हणून काम करत होते. अशोक बबन औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्योती डमाळे करत आहे.
दुचाकीस्वार जागीच ठार
मालवाहू टेम्पो व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात रविवारी रात्री सव्वानऊला घडली. आळेफाटा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार : नाशिक बाजूने पुण्याकडे जाणारा मालवाहू टेम्पो (एमएच १४ जीयू ६१८३) व आळेफाटा चौकातून पुढे जाणारी दुचाकी यांच्यात आळेफाटा चौकापासून महामार्गावर जवळच अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील तुषार सुरेश मावळे (वय २७, रा. आळेफाटा, मूळ रा. लोणी मावळ, ता. पारनेर) हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. संदीप हाडवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा
दाखल केला आहे.
पुणे-पंढरपुर पालखी मार्गावरील जेजुरी ओद्योगीक वसाहत ते नीरा शहरा पर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने सतत अपघात होतात. गेली वीस वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले नाही. मागील महिनाभरापासून विविध अपघातात तेरा जणांचा बळी तर पंचवीस ते तीस लोक जखमी असून खर्चीक उपचार घेत आहेत.
४या सर्व अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. वारंवार पत्र व्यवहार करुन ही बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेतल्याचे जाणवते. अजून किती बळी गेल्यानंतर बांधकाम विभाग हा रस्ता रुंदीकरण करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांनी विचारला आहे.