पाकिस्तानला पुरवठा करण्याऐवजी आधी भारतीयांना कोरोना लस द्या; काँग्रेसचे 'सिरम'समोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 07:11 PM2021-04-08T19:11:46+5:302021-04-08T19:21:39+5:30
मोदी सरकारने पाकिस्तानला मोफत लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हडपसर : 'सिरम' इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसची निर्मिती करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आशेचा मोठा किरण दाखविला आहे.सध्या भारतासह अनेक देशांना सिरम मार्फत कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा केला जात आहे. मात्र, भारतीय जवानांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला मोफत लस पुरवण्याऐवजी सरसकट सर्व वयोगटातील देशातील जनतेला मोफत कोरोना लस उपलब्ध करून द्या अशी मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.
पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानला मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याबद्दल मांजरी येथील 'सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे फलक झलकावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष अमित घुले यांनी मांजरी येथे प्रसारमाधहडपसर मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून जम्बो कोव्हिडं रुग्णालय हडपसरला ग्लायडिंग सेंटर सारख्या मैदानावर तातडीने सुरु करण्यात यावे. तसेच भारत सरकारने शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला मोफत कोट्यवधी कोरोना लसीचे डोस देण्याऐवजी सर्व वयोगटातील भारतीय नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून द्यावी.
यावेळी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल शिरसाठ,प्रसाद वाघमारे, स्वप्नील डांगमाळी, अक्षय जगताप,संदीप ढेरे,स्वप्नील नाईक,सुजित गोसावी,राजू ठोंबरे,अक्षय चौधरी,सुरेश डोळस,राकेश भिलारे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात फलक झलकावून निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.