पीएमआरडीएच्या आराखड्यावर मत नोंदवण्यासाठी मुदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:40+5:302021-09-17T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यावर पुणे महापालिकेला आपले म्हणणे मांडण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यावर पुणे महापालिकेला आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने पीएमआरडीएला काही सूचना केल्या आहेत. वास्तविक पीएमआरडीएने पुणे महापालिकेकडे अधिकृतपणे नकाशे आणि अहवाल पाठवला असता, तर प्रशासनाला त्यावर अभ्यास करून तो महापालिकेच्या मुख्य सभेच्या समोर ठेवून अधिकृत मत नोंदवणे सोपे झाले असते. परंतु, पीएमआरडीएच्या तांत्रिक अधिकाऱ्यांना हे सगळे नको असल्यामुळे त्याने सौजन्य म्हणून देखील पुणे महापालिकेकडे अहवाल आणि नकाशे दिले नाहीत. याचा आम्ही निषेध करत असल्याचे उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.
पुणे महापालिकेचे म्हणणे मांडण्यासाठी त्यांना मुदतवाढ करून द्यावी. अधिकृतपणे नकाशा आणि अहवाल उपलब्ध करावेत. पारदर्शक कारभारासाठी हे गरजेचे आहे. याबाबत महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सकारात्मक विचार करावा, मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.