शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:21 AM2018-05-11T04:21:46+5:302018-05-11T04:21:46+5:30
शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे - शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय शेतकºयांसाठी नव्हे; तर दूध भुकटी उत्पादकांच्या भल्यासाठी घेतला आहे. त्याचा राज्यातील शेतकºयांना फायदा होणार नाही. शासनाने थेट शेतकºयांना किमान प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केली आहे.
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा कात्रज डेअरी येथे झाली. अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये निश्चित केला असून, सहकारी संघांना त्यासाठी सक्ती देखील केली आहे. निश्चित दरापेक्षा कमी दर देणाºया दूध संघांना नोटिसा काढल्या आहेत.
‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते-पोलिसांत झटापट
दुधाच्या प्रश्नावर गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारातून आत जाण्यावरून आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी दूध ओतले.