परतावा म्हणून सपाट जमीन द्या!
By admin | Published: September 2, 2016 05:32 AM2016-09-02T05:32:37+5:302016-09-02T05:32:37+5:30
खेड सेझमधील १५ टक्के परताव्याचा तिडा सुटताना दिसत नाही. सेझने शेतकऱ्यांना डोंगरदरीतील जमिनीला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे. ‘परताव्याची जमीन द्यायची, तर सलग
दावडी : खेड सेझमधील १५ टक्के परताव्याचा तिडा सुटताना दिसत नाही. सेझने शेतकऱ्यांना डोंगरदरीतील जमिनीला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे. ‘परताव्याची जमीन द्यायची, तर सलग व सपाट जमीन द्या . शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय परताव्याची जमीन परस्पर शासनाने ठरवू नये,’ अशी मागणी सेझबाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
बुधवारी मुंबई येथे १५ टक्के परताव्यासंदर्भात बैैठक झाली. यात शेतकऱ्यांनी ही मागणी केली. दावडी, निमगाव, गोसासी, कनेरसर, केंदूर या गावांतीत सेझबाधित शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य औद्यागिक क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेटी, पुण्याचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जागेत दोन ठिकाणी १५ टक्के परताव्यांची जमीन देऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी सुचवलेली जमीन मुळातच डोंगरदऱ्यातील असल्यामुळे शेतकऱ्यांनी या जमिनीला नापंसती दर्शविली. परतांव्याची ४५० एकर जमीन सलग व सपाट जमीन शेतकऱ्याच्या पसंतीने द्या. त्या वेळी विकसनासाठी कपात करण्यात आलेले ५८ कोटी रुपये व्याजासह परत करा. नाहीतर परताव्याची ४५० एकर अविकसित जमीन सेझने चालू बाजारभावाच्या चार पट्टीने घ्यावी, अशी मागणी केली. गेली आठ वर्षे प्रलंबित असलेला परतांव्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना त्यातून मुक्त करावे; अन्यथा या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी काशिनाथ दौैंडकर, मारुती गोरडे, बाळासाहेब माशेरे, राजाराम गोरडे, धोडिंभाऊ साकोरे, मारुती सुके, संतोष आरुडे, काशिनाथ हजारे, विष्णू हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)
दावडी, निमगाव, कनेरसर , केंदूर या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे पथक येणार आहे. त्यांना ही सेझ बाधित शेतकरी भेटून १५ टक्के परताव्याबाबत विचारणा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.