: वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:13+5:302021-06-02T04:10:13+5:30
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी ...
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी बजावलेल्या कामगिरीकडे लक्ष वेधले आहे. आता कोविडच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अभियान राबविण्यात आले. या काळातही तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. मात्र स्वतःला कोविडची लागण होण्याचा व जीव गमावण्याचा धोका असतानाही केवळ कर्तव्य म्हणून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. मात्र, इतकी चांगली कामगिरी बजावल्यानंतरही अत्यावश्यक सेवेपैकी एक असणाऱ्या वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आलेला नाही. वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांचा जनतेशी दैनंदिन येणारा निकटचा संपर्क लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचीही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.