मीटर रिडिंग ची कामे स्थानिक बेरोजगारांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:44+5:302021-06-27T04:08:44+5:30
आदिवासी भागातील वाढीव रक्कमेची बिले कमी करण्यासाठी महावितरण ने तळेघर व आडीवरे येथे सोय उपलब्ध केली आहे. परंतु आदिवासी ...
आदिवासी भागातील वाढीव रक्कमेची बिले कमी करण्यासाठी महावितरण ने तळेघर व आडीवरे येथे सोय उपलब्ध केली आहे. परंतु आदिवासी भागात विजेच्या अनेक समस्यांचा ससेमिरा नेहमीच आदिवासींचा पिच्छा करत असतो, त्यातच वीज नसताना येणारी भरमसाठ वीज बिले हा नेहमीचाच विषय आहे.
या साठी नुकतेच बिरसा ब्रिगेड आंबेगाव या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोडेगाव येथील महावितरणच्या कार्यालयास एक लेखी निवेदन सादर केले आहे.
वीज मीटरची रिडिंग न घेता अंदाजे मागील बिलाच्या आधारे पुढील बिल दिले जात असल्याने आदिवासी भागात वाढीव बिले येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आदिवासी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने मीटर रीडिंग चे काम याच भागातील तरुणांना मिळाल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न तर सुटेल. या वेळी संनघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण पारधी, तालुकाध्यक्ष आदिनाथ हिले, मातृशक्ती प्रमुख उमाताई मते प्रसिद्धीप्रमुख संतोष तिटकारे, युवा नेते मारुती दादा केंगले, ब्रिगेड चे मार्गदर्शक ज्ञानेश्वर शेखरे, मोहरे, रमेश आंबवणे, अशोक पोटे, संदीप केवाळे दिगंबर केंगले प्रकाश केंगले उपस्थित होते.
आंबेगाव तालुका आदिवासी भागातील वाढीव बिलासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करताना संघटनेचे कार्यकर्ते.