ससूनचे किमान ६० टक्के बेड्स कोविडसाठी द्या : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:03+5:302021-04-13T04:11:03+5:30
पुणे : पुणे शहरात दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील आरटीपीसीआर ...
पुणे : पुणे शहरात दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या केवळ २ हजारांच्या आसपास आहे. ही संख्या तातडीने वाढवावी़, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची भेट घेऊन केली़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या भेटती मोहोळ यांनी, शहरात सरासरी २५ हजार पैकी २३ हजार चाचण्या या खासगी लॅबमधून होत असल्याने संसर्गाची भीती जास्त असल्याने, खासगी लॅबमध्ये टेस्टिंग केल्यावर संबंधित रुग्ण संबंधित व्यक्ती विलगीकरणात राहीलच असे नाही, त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त केली़
दरम्यान, ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १ हजार ७५० इतकी आहे. मात्र, असे असतानाही कोरोनासाठी केवळ ५२० बेड्स ससूनने उपलब्ध केले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले़ एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव ठेवले असताना, ससूनमध्ये मात्र ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणूनच ससूनमध्ये किमान ६० टक्के बेड्स तरी राखीव ठेवावेत, या संदर्भातही त्यांनी मागणी केली़
--------------------------
फोटो मेल केला आहे़