दुधाला हमी भाव द्या
By admin | Published: November 22, 2014 11:38 PM2014-11-22T23:38:50+5:302014-11-22T23:38:50+5:30
केंद्र सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे कांदा व दुधाची भुकटी निर्याद बंदी घातली आहे. यामुळे शेतक:यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Next
मोरगाव : केंद्र सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे कांदा व दुधाची भुकटी निर्याद बंदी घातली आहे. यामुळे शेतक:यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुधाचे दर घसरल्याने दुग्ध उत्पादानासारखा जोडधंदा बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे याला हमीभाव न मिळाल्यास बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
नुकतेच कांदा निर्याती बंदीबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच दुधाची भुकटी बंदीचाही निर्णय झाला. यामुळे पर्यायाने गायीच्या दुधाचे दर 24 वरून 2क् र्पयंत तर म्हशीचे दर 27 र्पयत खाली आले आहेत.त्यातच पशुखाद्य किमती अद्याप जैसे थे आहेत.यामध्ये कुठल्याही प्रकारे चढ उतार झाला नाही.तर दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही चढया भावाने जैसे थे आहेत.यामुळे केंद्र सरकारचे शेतक यांच्या दृष्टीने आडमुठे धोरण आहे. एकीकडे अच्छे दिन येणार या प्रतिक्षेत असलेल्या शेतक:याला सध्या तरी बुरे दिन आहेत.यामुळे दुध व कांद्याला हमी भाव न मिळाल्यास जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समीतीचे सदय हनुमंत भापकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कांद्याचा तर एकरी खर्चही निघत नसल्याने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या बळीराजावर यंदा उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.