Pune Crime | "एक लाख रुपये दे, आईच्या कामगार विम्याचे पैसे मिळवून देताे"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:02 AM2023-02-16T09:02:31+5:302023-02-16T09:04:16+5:30

बुधवारी सायंकाळी वाकडेवाडी येथील कामगार कार्यालयाच्या आवारात सापळा रचला...

Give one lakh rupees, gets mother's labor insurance money pune bribe crime case | Pune Crime | "एक लाख रुपये दे, आईच्या कामगार विम्याचे पैसे मिळवून देताे"

Pune Crime | "एक लाख रुपये दे, आईच्या कामगार विम्याचे पैसे मिळवून देताे"

Next

पुणे : त्यांची आई बांधकाम कामगार मजूर. बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नाेंद असल्याने तिच्या निधनानंतर त्याला कामगार विम्यापाेटी २ लाख ३४ हजारांची रक्कम मिळणार हाेती. मात्र, त्यासाठी कार्यालयात येताच विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी १ लाख रुपये देण्याची मागणी एका महिलेसह ५६ वर्षीय व्यक्तीने केली. त्यासाठी ॲडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या दाेघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

योगिता अरुण शेंडगे (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), फारुख हनीफ पठाण (वय ५६, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) अशी त्यांची अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या आईचे फेब्रुवारी २०२२ मध्ये निधन झाले. त्यांची बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये बांधकाम मजूर म्हणून नोंदणी असल्याने त्यांना कामगार विमा म्हणून २ लाख ३४ हजार रुपये कामगार कार्यालयाकडून मिळणार होती. त्यासाठी तक्रारदार कामगार कार्यालयात आले होते. त्यावेळी योगिता शेंडगे व फारुख पठाण यांनी त्यांना रक्कम मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळी कागदपत्रे मागवून घेतली. त्यावरून ते तेथील कर्मचारी असल्याचा त्यांचा समज झाला. योगिता हिने शेंडगे यांनी साहेबांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून १ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ॲडव्हान्स म्हणून १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

त्यानंतर बुधवारी सायंकाळी वाकडेवाडी येथील कामगार कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाच घेताना योगिता शेंडगे हिला पकडण्यात आले. तिला साहाय्य करणाऱ्या फारुख पठाण यालाही पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुणे एसीबी युनिटचे पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत आहेत.

Web Title: Give one lakh rupees, gets mother's labor insurance money pune bribe crime case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.