पीएमपीच्या जुन्या बस फिरत्या बाजारासाठी द्या

By admin | Published: April 24, 2017 05:00 AM2017-04-24T05:00:23+5:302017-04-24T05:00:23+5:30

शेतकऱ्यांना त्यांचा ताजा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी घेऊन जाता यावा, यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना

Give the PMP's old bus for the tourism market | पीएमपीच्या जुन्या बस फिरत्या बाजारासाठी द्या

पीएमपीच्या जुन्या बस फिरत्या बाजारासाठी द्या

Next

पुणे : शेतकऱ्यांना त्यांचा ताजा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी घेऊन जाता यावा, यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना पीएमपीच्या जुन्या बस उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरातील विविध भागात भाजीपाला विकता येईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.
बालगंधर्व रंगमंदिर परिसरात भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र
आंबा महोत्सव’ला शेट्टी यांनी भेट दिली. तसेच आंबा उत्पादकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी शेट्टी बोलत होते. कार्यक्रमास पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, आम्ही पुणेकर प्रतिष्ठानचे रवी सहाणे आदी उपस्थित होते.
कर्नाटक आंबा, रत्नागिरी किंवा देवगड हापूस या नावाने विकला जात आहे. त्यामुळे कोकणातील आंबा विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका
बसत आहे, अशी कैफियत आंबा विक्रेत्यांनी मांडली.
राजेंद्र जगताप म्हणाले, फिरत्या बाजरासाठी बस देण्याबाबत विचार केला जाईल.

Web Title: Give the PMP's old bus for the tourism market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.