रिक्षाच्या सीएनजी किटला त्वरित अनुदान द्या!
By admin | Published: September 19, 2014 12:41 AM2014-09-19T00:41:59+5:302014-09-19T00:41:59+5:30
ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने आयोजित आणि सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन आमदार गिरीष बापट यांनी केले.
Next
पिंपरी : रिक्षाचालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची त्वरित स्थापना करावी, सीएनजी किटसाठी अनुदान द्यावे आदी ठराव येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात झालेल्या रिक्षाचालक-मालक संघटना प्रतिनिधी आणि रिक्षाचालक-मालकांच्या राज्यव्यापी मेळाव्यात मंजूर करण्यात आला.
ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने आयोजित आणि सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन आमदार गिरीष बापट यांनी केले. या वेळी नरेंद्र गायकवाड (नांदेड), प्रमोद घोणो (मुंबई), राजू इंगळे (नागपूर), तानाजी मसलकर (सोलापूर), प्रल्हाद सोनवणो (जळगाव), कासम मुलानी (नवी मुंबई), मल्हार गायकवाड (कल्याण, डोंबिवली), राजू सदगणो, महिपती पवार (सोलापूर), बाबा शिंदे (पुणो), अशोक साळेकर (पुणो), भीमराव मोरे (दौंड) आदी उपस्थित होते.
या वेळी एकूण 13 ठराव मांडण्यात आले आणि यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बाळासाहेब डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ कलाटे यांनी प्रास्ताविक केले, तर सुदाम बनसोडे यांनी आभार मानले. संयोजन सुदाम बनसोडे, वकील शेख, विनायक देवकुळे, रवी चांदणो, इकबाल शेख, बाळासाहेब सूर्यवंशी, महेश कांबळे, संतोष यादव यांनी केले.
जवळपास 15 लाख रिक्षाचालक-मालकांसाठी सामाजिक सुरक्षा मिळावी, आरोग्य सुविधा, अपघाती विमा, औषधोपचार या किमान गरजेच्या सुविधा तातडीने विनाअट सरकारने पुरवाव्यात.
शहरात तातडीने सीएनजी सुविधा सुरू करून तेथेही सीएनजी पंप सुरू करावेत. रिक्षाला सीएनजी किटसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य, केंद्र सरकारने अनुदान द्यावे. डेड परवाने जिवंत करून ते लायसन्स बॅचधारक जुन्या रिक्षाचालकांना द्यावेत. रिक्षाचालक-मालकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षाचालक-मालकांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावे. या आधारे कमी व्याज दरात रिक्षाचालक-मालकांना कजर्पुरवठा व्हावा.
रिक्षाचे वय किती याबाबतचा तिढा तातडीने सोडवावा. कृती समितीच्या वतीने नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी राज्यव्यापी मोर्चा काढून तीव्र आंदोलन करावे आदी ठराव मंजूर करण्यात आले. रिक्षाचालक-मालकांचे देशव्यापी फेडरेशन स्थापन करण्यासाठी संघटना नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी संयुक्त निमंत्रक म्हणून शरद राव आणि बाबा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)