आम्हाला हक्काचं पाच टीएमसी पाणी मिळवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:21+5:302021-05-24T04:09:21+5:30
यासंदर्भात माहिती देताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे म्हणाले की, देशाचे नेते पवारसाहेब यांनी एक दिल्लीला ...
यासंदर्भात माहिती देताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे म्हणाले की, देशाचे नेते पवारसाहेब यांनी एक दिल्लीला फोन केला तर खताच्या किमती वठणीवर आल्या. दिल्लीत तर भाजपचे सरकार आहे. परंतु, राज्यात आपल्या विचाराचे पवारसाहेब महाराष्ट्र राज्यात सरकार आहे. त्यामुळे फक्त तुमच्या एका कॉलची इंदापूर तालुक्याला नितांत गरज आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे व आगामी काळातदेखील त्याच पद्धतीने उभा राहणार आहे, अशी ग्वाही डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिली.
शासकीय स्तरावरूनच इंदापूर तालुक्याला पुण्यातून येणारे पाच टीएमसी सांडपाणी शेतीसाठी देण्याचा निर्णय झाला होता. साठ गावांतील शेतकरी आपण हा जो निर्णय दिला होता, या निर्णयामुळे शेतकरी खूष होता. मात्र, आपल्याच पक्षाचे जलसंपदामंत्री अचानकच सोलापूर जिल्ह्याच्या दबावाला बळी पडून, चुकीच्या गोष्टी ऐकून इंदापूर तालुक्याला मिळणारे पाच टीएमसी पाणी योजना स्थगित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर विरजण पडले आहे.