कोरोना चाचणी करण्याऐवजी शिक्षकांना लसच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:54+5:302021-01-23T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे गेल्या दहा-अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे गेल्या दहा-अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यापेक्षा शिक्षकांनाच कोरोनाची लस प्राधान्याने द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजीत शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी जादा खर्च येतो, या तुलनेमध्ये कोरोना लसीसाठी कमी खर्च येतो. त्यामुळे शिक्षकांना कोरोना लस द्यावी, म्हणजे त्यांना शाळेमध्ये वर्गावर अध्यापन करणे अधिक सुरक्षित आणि सोपे होईल, असे नमूद करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात यांची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा झाली असून, ते सकारात्मक असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.