बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:07 AM2018-04-16T02:07:07+5:302018-04-16T02:07:07+5:30

निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

 Give water through closed waterfalls, opinion of experts | बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

Next

इंदापूर - निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
पाणी मोजून बंद जलवाहिनीद्वारे शेतकºयांना उपलब्ध करून देण्याचा उपाय हितकारक ठरेल. त्यामुळे वीर भाटघर धरणामधील शिल्लक राहिलेले पाणी वेळोवेळी नीरा नदीवरील बंधाºयांमध्ये सोडता येईल. दरवर्षी पाऊसमान कमी होत चाललेले आहे, हा गैरसमज शेतकºयांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७५० मिमी आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात तीस ते चाळीस पावसाळी दिवसांत तेवढाच पाऊस पडत आहे. जून, जुलै व सप्टेंबर हा त्याचा कालावधी आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटार टाकून पाणी उपसले जात आहे. बाभुळगाव ते नृसिंहपूर भागातील नदीला पाणी सुटले, की विद्युत मोटारीने पाणी उपसतात. जांब, कुरवलीपासून नृसिंहपूर भागातील शेतकरी बंधाºयातील पाणी वापरतात. तालुक्यातून वाहणाºया नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातूनही सायफन वा विद्युत मोटारीने पाणी उचलतात. नदी, नाले, ओढे कोरडे पडतात. दुष्काळसदृश स्थिती उद्भवते.

तुटपुंज्या पाण्यावर करावी लागतेय शेती
४शासनाचे पाणीवाटपाचे धोरण कालबाह्य ठरत चाललेले आहे. नीरा डाव्या व उजव्या कालव्याला सोडलेले सत्तर टक्के पाणी शेतकºयांच्या शेतीपर्यंत पोहोचेस्तोवर कालव्यामधून झिरपून ओढ्या, नाल्यांना मिळते. पाणी उचलून शेतकरी आपल्या शेततळ्यात सोडतात. तुटपुंज्या प्रमाणात राहिलेले पाणी अधिकृतपणे शेतीला वापरले जाते. त्याचा पिकाला पाहिजे तसा वापर होत नाही. कारण एकदा पाटपाण्याने पाणी दिल्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याची पाळी येते. तोवर पाण्याअभावी पीक जळालेले असते.

या निसर्ग वा मानवनिर्मित दुष्काळापासून शेती वाचवायची असेल तर जलसंपदा खात्याने सखोल अभ्यास करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत वापरात आणावी.
पाण्याची किंमत ठरवून पाणी मोजून ते शेततळी भरण्यासाठी अधिकृतपणे शेतकºयांना द्यावे. बंद जलवाहिनीतून पाणी दिल्यास नीरा डाव्या कालव्यावर असणारा बारामती, इंदापूरच्या आसपासचा भाग सिंचित होईल. वीर भाटघर धरणात पाणी शिल्लक राहील. असेच नीरा उजव्या कालव्याच्या क्षेत्रातही दिसून येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

Web Title:  Give water through closed waterfalls, opinion of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.