बीओसीडब्ल्यू निधीतून कामगारांना किमान पाच हजार रुपये द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:33+5:302021-04-12T04:10:33+5:30
पुणे :- क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून जवळपास २५ लाख कामगार जोडले गेले आहेत. बीओसीडब्ल्यूकडे राष्ट्रीय पातळीवर विकासकांमार्फत सुमारे ३०,००० कोटी ...
पुणे :- क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून जवळपास २५ लाख कामगार जोडले गेले आहेत. बीओसीडब्ल्यूकडे राष्ट्रीय पातळीवर विकासकांमार्फत सुमारे ३०,००० कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बीओसीडब्ल्यू निधीतून कामगारांना पाच हजार देण्याचे आवाहन क्रेडाई महाराष्ट्रतर्फे करण्यात आले.
गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाच्याच्या दुसऱ्या लाटेत आपली नोकरीविषयीची साशंकता तसेच त्यांचे आरोग्याची होणारी हानी लक्षात घेता मजूर परत आपापल्या गावी जाण्याची भीती आहे. याशिवाय रेरा, बँका आणि ग्राहक यांच्या मागण्या मुदतीच्या पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्र पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु सद्यस्थितीमुळे ते शक्य होत नसल्यामुळे बांधकाम उद्योगावर याचा मोठा नकारात्मक होतो आहे. मजुरांच्या अपुऱ्या संख्येमुळे बांधकाम पूर्ण होण्यास उशीर होता त्यामुळे नुकसान तर होतेच पण रेरात सांगितलेल्या वेळेत काम होणे अशक्य होते. शिवाय रेरामधील अनेक कायदेशीर खटल्यांचा निकालदेखील देता येत नाही. मागच्या वर्षी मजूर मिळविण्यासाठी व्यावसायिकांना ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला होता. त्यानंतर सरकारकडून या कामाला ६ महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती. पण प्रत्यक्षात ९ महिन्यांपेक्षा जास्त काळ व्यावसायिकांना गमवावा लागला होता.
मुख्यमंत्र्यांना आमची आग्रहाची विनंती आहे की, या प्रकरणांत लक्ष घालून बांधकाम मजुरांना बीओसीडब्ल्यूच्या खात्यातून किमान ५००० रुपये मदत करावी, अशी मागणी क्रेडाई महाराष्ट्राचे नवीन अध्यक्ष सुनील फुरडे यांनी केली.
क्रेडाई महाराष्ट्रातील विकसकांनी यापूर्वीच मोफत लसीकरण, कामगार शिबिरांची स्वच्छता, त्यांच्यासाठी जास्तीत स्वच्छतागृहे उभारणे तसेच त्यांच्या आरोग्याविषयी योग्य ती काळजी घेण्याचे सकारात्मक कार्य केले आहेत. गेल्या वर्षीदेखील विकसक सदस्यांनी लॉकडाऊन असतानाही मोफत अन्न, वेतन आणि निवारा देऊन महामारीच्या आजारात कामगार कल्याणसाठी सर्व आवश्यक पावले उचलली होती.
---------------
विविध विषयांवर चर्चा
क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट बोमन इराणी यांनी झूमवर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील फुरडे यांच्यासह ५९ शहरांतील ५००हुन अधिक विकसकांसाठी वेबिनारचे आयोजन केले होते. यात क्रेडाई नॅशनलचे चेअरमन सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह अनेक वक्तेदेखील सहभागी झाले होते. रिअल इस्टेटमधील बदलता प्रवास, ऑटोमोबाईल सेक्टर, मुंबईतील स्थावर मालमत्तेच्या प्रवाहातील बदल, या क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान अशा विषयांवर यावेळी चर्चा केली.
------------