'लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो...' पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 01:29 PM2023-03-12T13:29:07+5:302023-03-12T13:29:16+5:30

व्यावसायिक आरोपीने दाखवलेल्या आमिषाला बळी पडला

Gives a franchise in the context of loan processing Fraud of a businessman in Pune worth a quarter of a crore | 'लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो...' पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक

'लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो...' पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक

googlenewsNext

पुणे : कर्ज प्रक्रिया संदर्भातील फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कॅम्प परिसरातील ३८ वर्षांच्या व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी याकुबअली ख्वाजा अहमद ऊर्फ याका (वय ४६, रा. हैदराबाद, तेलंगणा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फेब्रुवारी २०२२ ते आतापर्यंत घडली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून, त्यांची पुण्यात जागा आहे. आरोपीने त्यांच्याकडील शॉप व जागा भाड्याने हवी आहे, असे सांगून संपर्क केला होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादींना झायसोल इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. लि., या लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो व त्याबदल्यात भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. फिर्यादीदेखील आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडले. त्यांनी आरोपी सांगेल त्याप्रमाणे काही रोख पैसे, तर ऑफिस तयार करण्याच्या बहाण्याने एकूण वेळोवेळी १ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये हवाली केले. दरम्यान, गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा परत मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्जाच्या चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Gives a franchise in the context of loan processing Fraud of a businessman in Pune worth a quarter of a crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.