पांजरपोळमुळे १२०० भाकड जनावरांना जीवदान

By Admin | Published: October 27, 2016 05:05 AM2016-10-27T05:05:50+5:302016-10-27T05:05:50+5:30

येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट गेल्या १५० वर्षांपासून निकामी झालेल्या भाकड गायीचा सांभाळ करते. बुधवारी (दि. २६) वसुबारसनिमित्ताने येथील ७०० गायींची पूजा करण्यात आली.

Giving 1200 livestock animals to the ground due to the pollen | पांजरपोळमुळे १२०० भाकड जनावरांना जीवदान

पांजरपोळमुळे १२०० भाकड जनावरांना जीवदान

googlenewsNext

भोसरी : येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट गेल्या १५० वर्षांपासून निकामी झालेल्या भाकड गायीचा सांभाळ करते. बुधवारी (दि. २६) वसुबारसनिमित्ताने येथील ७०० गायींची पूजा करण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनी येथील तब्बल १२०० जनावरांसाठी गूळ फुटाणे व हिरवा चारा दान केला.
पुणे पांजरपोळ ट्रस्टने आजपर्यंत हजारो भाकड गायी व इतर जनावरांना जीवदान दिले आहे. सन १८५५मध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे. आज संस्थेकडे भोसरी येथे ७०० गायी, ३७० बैल, ७० म्हशी, व ६० रेडे अशी एकूण १२०० भाकड जनावरे आहेत. बेकायदेशीररीत्या कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे पोलिसांनी वेळोवेळी पकडून संस्थेकडे दिली आहेत. अशी जनावरे मिळवण्यासाठी संस्था कायदेशीर लढाई लढते व जास्तीत जास्त जनावरांना जीवदान देण्याचा प्रयत्न करते. भोसरी येथे संस्थेची एकूण १२ एकर जागा आहे, त्यातील ६ एकर जागेवर १० गोठे, कृमी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, सभागृह, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. समाजातील दानशूर नागरिक वेळोवेळी संस्थेला आर्थिक व जनावरांना चाऱ्याच्या रूपाने देणग्या देत असतात. या देणग्यांमधूनच संस्थेचे खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व जनावरांच्या संगोपनासाठी व उपचारासाठी लागणारे पैसे खर्च होतात.
संस्थेत या जनावरांच्या संगोपनासाठी ५० कर्मचारी
अहोरात्र कार्यरत आहेत. ओमप्रकाश रांका हे संस्थेचे अध्यक्ष असून,
एकूण १२ सदस्य व्यवस्थापकीय मंडळात आहेत. (वार्ताहर)

पुणे पांजरपोळ ट्रस्ट गोपालन धाम या संस्थेचे मुख्य काम हे समाजातील अनाथ व भाकड जनावरांना जीवदान देऊन त्यांचे योग्य संगोपन करणे हे आहे. तसेच गोहत्या थांबवण्यासंबंधी जनजागृती करण्याचे कामही संस्था करते. त्यात कोणताही आर्थिक स्वार्थ नसून, येथे येणाऱ्या प्रत्येक जनावराची नि:स्वार्थ भावनेने काळजी घेतली जाते. जनावरांचे खरे महत्त्व समाजाला कळणे गरजेचे आहे. गोहत्येविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे गरजेचे आहे. जो गरीब शेतकरी आपली जनावरे पोसू शकत नाही, त्यांनी आपली जनावरे संस्थेकडे सोपवावी. पण, शुल्लक पैशांसाठी त्यांना कसायाच्या स्वाधीन करू नये.
- विनोद पालोरकर (व्यवस्थापक, पुणे पांजरपोळ ट्रस्ट, भोसरी)

Web Title: Giving 1200 livestock animals to the ground due to the pollen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.