चांगला बाजारभाव देणार
By admin | Published: October 29, 2014 10:58 PM2014-10-29T22:58:12+5:302014-10-29T22:58:12+5:30
सभासद कामगारांच्या सहकार्याने सर्वात जास्त दर आणि बोनस सभासदांना देऊ, असे मत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले.
Next
माळेगाव : सभासद कामगारांच्या सहकार्याने सर्वात जास्त दर आणि बोनस सभासदांना देऊ, असे मत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 58 व्या गळीत हंगाम आजपासून सुरू करण्यात आला. कारखान्याचे ज्येष्ठ सभासद तसेच कामगार व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रंजन तावरे म्हणाले, कारखाना कामगार, सभासद, संचालक मंडळ यांनी एकत्रितरित्या कारखान्याच्या प्रगतीत सहभाग घेतल्याने कारखाना सुस्थितीत आला आहे. तसेच, कारखान्याने सभासदांच्या ऊसतोडीसही प्राधान्य देणार आहे.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी कोकरे, विश्वासराव देवकाते, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश तावरे, बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप जगताप, बारामती दूध संघाचे अध्यक्ष नितीन आटोळे, इंद्रसेन आटोळे, आत्माराम आटोळे, अरूण गायकवाड, अशोक सस्ते, प्रकाश देवकाते, पोपट बुरूंगुले, ऊस
विकास अधिकारी सुरेश नाळे,
मदन देवकाते, राजेंद्र देवकाते,
सुरेश खलाटे, दीपक तावरे, दत्तात्रय येळे, दत्तात्रय खलाटे, विलास आटोळे, भारत पिसे, बाळासाहेब वाबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
महाराष्ट्राने आदर्श घ्यावा, अशा पद्धतीने कारखाना चालवू शकलो. याचे श्रेय सभासद, कामगार तसेच संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाला दिले. कारखान्याकडे 22 हजार एकर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे कारखाना प्रथम सभासदांच्या उसाचे गाळप करेल. ऊस मजूर टोळ्या दोन ते तीन दिवसांत कारखाना परिसरात येणार आहेत. त्यानंतरच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात गाळप सुरू होईल. कारखाना लवकरच दोन नविन गोडावून बांधण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यामुळे दरवर्षी साखरपोती भिजण्याने होणारे नुकसान टाळता येणार आहे, आगामी काळातही उसाचे प्रतिएकरी टनेज वाढवावे, तसेच चांगला बाजारभाव देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.