इंदापूर तालुक्यात प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:35 PM2019-02-05T13:35:41+5:302019-02-05T13:52:07+5:30
इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या विमानातील शिकाऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली आहे.इंदापूर तालुक्यात बाबीर रुई या गावामध्ये श्री बाबीर विद्यालयाजवळ विमान कोसळले. प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ग्लेडर विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोसळले. यामध्ये शिकाऊ सिद्धार्थ टायटस हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे हे विमान अक्कलकोट वरून बारामतीला निघाले होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान खाली कोसळले असे टायटस यांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांला तत्काळ गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या हातापायाला मार लागला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी बारामतीला दाखल करण्यात आले.
टायटस हे सकाळी १० वाजता अक्कलकोट येथुन विमान घेऊन बारामतीला निघाले होते दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस ३५०० हजार फुटांवरुन कोसळले चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोकळ्या जागेत पडले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीयाठिकाणी विमान पडल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.