जुन्या तेलुगू चित्रपटांच्या काचेच्या स्लाइड एनएफएआयच्या खजिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:07+5:302021-07-31T04:12:07+5:30

पुणे : भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तऐवज असलेल्या १९३० ते १९५० च्या दशकातील तेलुगू चित्रपटांच्या ४५० पेक्षा अधिक ...

Glass slides of old Telugu movies in NFAI's treasury | जुन्या तेलुगू चित्रपटांच्या काचेच्या स्लाइड एनएफएआयच्या खजिन्यात

जुन्या तेलुगू चित्रपटांच्या काचेच्या स्लाइड एनएफएआयच्या खजिन्यात

Next

पुणे : भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तऐवज असलेल्या १९३० ते १९५० च्या दशकातील तेलुगू चित्रपटांच्या ४५० पेक्षा अधिक काचेच्या स्लाइडची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असलेल्या दुर्मीळ स्लाइड्स चित्रपटाच्या प्रारंभ युगाची साक्ष देणाऱ्या ठरल्या आहेत.

नव्या चित्रपटाची घोषणा तसेच जाहिरात करण्यासाठी या स्लाइडचा वापर होत असे. आज वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या काळात हा ऐतिहासिक खजिना एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे अतिशय दुर्मीळ आणि महत्त्वाचा शोध म्हणता येईल, असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली.

दस्तऐवज विभागाच्या प्रभारी आरती कारखानीस म्हणाल्या, चित्रपटसृष्टीचे संशोधन करणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ असून लवकरच हे डिजिटल स्वरूपातही आणले जाईल.

या खजिन्यामध्ये विधवा पुनर्विवाहावर आधारित वाय. व्ही. राव यांचा ‘मल्ली पेल्ली’ (१९३९), बी. एन. रेड्डी यांचा ‘वंदे मातरम’ (१९३९), चित्तोड व्ही नागय्या अभिनित ‘किलु गुरर्म’ (१९४९), एन. टी. रामाराव यांचा ‘दासी’ (१९५२), शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या गाजलेल्या देवदास चित्रपटाची तेलुगू आवृत्ती असलेला राघवय्या यांचा ‘देवदासू’ (१९५३) यांसह ७० तेलगू चित्रपटांच्या स्लाइड्स आहेत.

फोटो - ग्लास स्लाईड

Web Title: Glass slides of old Telugu movies in NFAI's treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.