चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:14+5:302021-08-24T04:15:14+5:30
चष्मा लागणे म्हणजे कमीपणा, चेहऱ्याचे सौंदर्य जाणे किंवा चष्मा लागला तर लग्न जमण्यातही अडचणी असा एक जमाना होता, त्यासाठी ...
चष्मा लागणे म्हणजे कमीपणा, चेहऱ्याचे सौंदर्य जाणे किंवा चष्मा लागला तर लग्न जमण्यातही अडचणी असा एक जमाना होता, त्यासाठी अनेकजण चष्मा घालविण्यासाठी अनेक उपचारांसह शस्त्रक्रियाही करून घेत होते. मात्र आता चष्मा नसला तरी चेहऱ्याचा लूक बदलण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा वापरण्याची क्रेझ आली. याशिवाय स्क्रीन टाइम वाढल्यानेही डोळ्यांवर त्यांचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून, बाहेर प्रवास करताना धूळ आणि प्रखर प्रकाशापासून वाचण्यासाठी चष्म्याचा वापर केला जातो. शिवाय अनेकदा फोटोसेशनसाठीही चष्मा वापरला जातो. इतकेच नव्हे तर विविध ॲप्समध्येही सेल्फी काढताना कॅमेरा फिल्टरमध्येही चष्मा देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे हल्ली चष्मा हा चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी पोषकच ठरतो, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.
चष्मा वापरतानाही त्या चष्माची फ्रेम, ग्लास (काच), टेम्पल्स (कानावर अडविण्यात येणाऱ्या काड्या), ब्रीज (दोन काचांना जोडणारी फ्रेमच्या मधली तार), नोझ पॅड्स (नाकावर चष्मा ठेवण्यासाठीचा स्पंजसारखा भाग), पॅड आर्म्स (नोजपॅड्स अडविण्यासाठीच्या खाचा) या साऱ्या बारीक-सारीक गोष्टी अधिक स्टायलिश कशा असतील आणि त्यामुळे स्पेक्टलूक्स हटके कसा दिसेल याची काळजी घेणारी तरुणाई सर्वत्र दिसते.
जत्रेमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गॉगल्स आणि चष्म्याची दुकाने असतात. त्यामुळे चष्मा किंवा गॉगल्सची क्रेझ किती जुन्या काळापासून आणि ती सर्व वर्गात दिसते हेच जणू सिद्ध होते. जत्रेत मिळणाऱ्या शंभर रुपयांच्या चष्मापासून ते चष्माच्या स्वतंत्र मॉलमध्ये मिळणाऱ्या लाखो रुपयांचे चष्मे बाजारात मिळतात. मात्र त्याच्या काचेचे दृष्टीवर काय परिणाम होतात, याकडे लक्ष ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर चष्म्याचा किंवा फ्रेमचा आकार महत्त्वाचा आहे. कोणत्या प्रकारच्या चेहऱ्यासाठी कोणता प्रकारचा चष्मा असावा यासाठीही चष्म्याच्या दुकानादारांपासून ते ब्युटीशिअन्सपर्यंत अनेक ठिकाणी सल्ले दिले जातात. त्यातील काही ढोबळ सल्ले दिले जातात. त्यातील निवडक टिप्स अशा.
गोलाकार चेहरा
गोलाकार चेहऱ्यासाठी रेक्टअँगल चष्मा अधिक जास्त प्रभावी दिसतो. रेक्टॲंगलमधील कॉर्नर शार्प असला की मग चेहरा थोडासा स्लीम आणि लांब दिसायला लागते. फक्त आपल्या गालांच्या अस्थीच्या थोडासा वरपर्यंत चष्माच्या ग्लासेस असावेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
आयताकार चेहरा
आयताकार चेहऱ्यासाठी आपण चष्मा घेणार असाल तर थोडी वर्क डिझाईन असणारे चष्मे चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवितात. मात्र या चष्माचे ब्रीज हे अधिक मोठे असू नये यासाठी खास लक्ष देणे गरजेचे आहे.
त्रिकोणी चेहरा
त्रिकोणी चेहऱ्यावर वापरण्यासाठीचे चष्माचे ग्लासेस हे खालच्या बाजूला (गालावर) अधिक लांबपर्यंत येणारे असतील तर ते चेहऱ्यावर अधिक शोभतो. शिवाय रीमलेस चष्माही अशा त्रिकोणी चेहऱ्यांना अधिक स्मार्ट बनवितो.
डायमंडशेप चेहरा
अशा शेपच्या चेहऱ्यांमध्ये डोळे अधिक लक्षवेधक असतात. त्यामुळे अशा चेहऱ्यांसाठी हेवी शेपफ्रेम किंवा हाफ रिमलेस चष्मा अधिक उठून दिसतो. किवा ओव्हल राऊउंड शेप फ्रेमसुध्दा या चेहऱ्यावर अधिक चांगला दिसतो.