शहर पोलिसांची झलक दिसली, आता कारवाईची हवा दाखवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:37+5:302021-04-14T04:09:37+5:30
- उरुळी कांचन : लोणीकाळभोर व लोणीकंद ही दोन पोलीसठाणी ग्रामीण पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात ...
-
उरुळी कांचन : लोणीकाळभोर व लोणीकंद ही दोन पोलीसठाणी ग्रामीण पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट झाली असल्याने, या हद्दीतील गुन्हेगारी, वाहतूक नियंत्रण , आर्थिक , सायबर गुन्हे, अवैध धंदे, वाळू तस्करी अवैध सावकारी या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करुन या हद्दीत पुणे शहर पोलिसांची ' हवा ' काय आहे ते दाखवू असा सज्जड इशारा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात बीट मार्शल (२४ तास पोलीस मदत सेवा ) युनिटच्या सेवेचा शुभारंभ पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी युनिटच्या पोलीस पथकाला हिरवा झेंडा दाखवून गुप्ता यांनी शुभारंभ केला. यावेळी हडपसर परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते , लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे , उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, ग्रामीण पोलिस दलातील मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी , उरुळी कांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन , उपसरपंच संचिता कांचन, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर , जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे, पोलीस कर्मचारी सचिन पवार, सोमनाथ सितारेेे, अमोल भोसले, रुपेश भगत, संदीप पवार प्रमोद शिंदे, विविध गावचे सरपंच व पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले की, लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहरात २३ मार्च रोजी समाविष्ट केल्यानंतर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात मंजूर संख्याबळातील ५० टक्के कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे.उर्वरीत येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्याने येतील. या ठिकाणी शहरा प्रमाणे प्रत्येक विभागानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.या ठिकाणी तत्पर सेवेसह सामान्यांना आश्वासक पोलीस सेवा कशी देता येईल हे प्राधान्य असणार आहे. कार्यक्रमात सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रासाठी आयुक्तांच्या मागणीनुसार २० गुंठे जागा उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन दिले आहे. कार्यक्रमात आभार प्रदर्शन वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.
--
चौकट.
उरुळी कांचन ग्रामीण पोलीस दलात की शहरात सस्पेन्स कायम !
नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात आणण्यासाठी शासनाला ८ कोटी रुपये खर्च करावा लागतो व या संपूर्ण प्रक्रियेला ८ ते १० महिन्यांची वेळ अपेक्षित आहे. या भागातील भौगोलिक हद्दीचे विभाजन करुन नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात आणण्याचे विचाराधीन असल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. परंतु ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावाबाबत भाष्य न केल्याने पोलीस ठाण्याचा सस्पेन्स कायम राहिला आहे.
--
फोटो क्रमांक :१३लोणीकाळभोर पोलीस फोटो ओळ - पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात बीट मार्शल सेवेचा शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून करताना सरपंच संतोष कांचन व पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पदाधिकारी.