गौरवास्पद ! तृतीयंपथीयांच्या सन्मानासाठी सरसावले पुणे पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:18 PM2019-05-13T12:18:29+5:302019-05-13T12:28:42+5:30
तृतीयपंथीयांना आत्मसन्मानाने जगता यावे़, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करता यावे़,यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
- विवेक भुसे-
पुणे : तृतीयपंथीयांशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही़ ते रस्त्यावरुन जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाणेच सर्वजण हिताचे समजतात़. अशावेळी त्यांना नोकरीवर ठेवणे हे अवघडच़... त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे़ एखादा व्यवसाय करता यावे, यासाठी पुणेपोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून शहरातील तृतीयपंथीयांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करता येईल, यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात आल्या़.
तृतीयपंथांना कोणी नोकरी देत नाही़. त्यामुळे गरीब घरातील मुले हे भीक मागण्याचे काम करतात़. दुकानदार, लोकांकडे टाळ्या वाजून पैसे मागतात़ लोकांनी त्यांनी आपल्यासमोर अधिक वेळ थांबू नये, म्हणून त्यांच्या हातावर पैसे टेकवतात़. मात्र, त्यांच्या जीवनाला स्थिरता मिळत नाही़. आत्मसन्मानाने जगणे मुश्किल असते़ हे लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या तृतीयपंथीयाच्या आत्मसन्मानासाठी काय करता येईल, यासाठी बुधवार पेठ परिसरातील तृतीयपंथीयांची बैठक घेतली़. त्यांना कोणती नोकरी करणे शक्य होईल, याची चाचपणी केली़. त्याचवेळी तृतीयपंथी हे सुरक्षा एजन्सी चांगली चालवून शकतील़. मॉलमध्ये, मोठ्या दुकानात त्यांना सुरक्षाचे काम मिळू शकते़. तसेच कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या सुरक्षेचे काम मिळू शकते, असा विचार करण्यात आला़ त्यादृष्टीने त्यांना सुरक्षा एजन्सी स्थापन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत़.
लोकसभा निवडणुकीत पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने गेल्या काही दिवसात हा विषयाकडे संपूर्ण लक्ष देणे शक्य झाले नव्हते़. आता पुन्हा एकदा सर्व तृतीयपंथीयांना एकत्र करुन त्यांना त्यांची संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास येणार असल्याचे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़.
तरुण तृतीयपंथीयांकडून पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळत आहे़. जुन्या लोकांना आपल्या कामात बदल करण्यात काही अडचण वाटत आहे़ मात्र, त्यांनाही यात सामावून घेण्यात येणार आहे़.
़़़़़़़
तृतीयपंथीयांनी केवळ दुसºयांनी दिलेल्या पैशावर गुजराण न करता स्वत:चा आत्मसन्मान राखून जीवन जगावे़ त्यांनाही समाजात इतरांप्रमाणे जगता यावे, यासाठी काम उपलब्ध करुन देण्याचा एक प्रयत्न आहे़. त्यासाठी त्यांना मदत करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे़.
किशोर नावंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे़
़़़़़़़़़़
शहरात बुधवार पेठ व परिसरात सुमारे २५० ते ३०० तृतीयपंथी आहेत़. तर, शहरात सुमारे एक हजाराहून अधिक तृतीयपंथी असल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे़. या तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने आतापर्यंत त्यांच्याबरोबर पोलिसांच्या ३ बैठका घेण्यात आल्या आहेत़.