लोकमत गृह प्रदर्शनाची दिमाखदार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:10 AM2018-10-14T01:10:04+5:302018-10-14T01:10:45+5:30

आज शेवटचा दिवस : दसऱ्यानिमित्त अनेकांनी केले स्वत:च्या नवीन घराचे स्वप्न साकार

A glorious start of Lokmat Home Exhibition | लोकमत गृह प्रदर्शनाची दिमाखदार सुरुवात

लोकमत गृह प्रदर्शनाची दिमाखदार सुरुवात

Next

पुणे : पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कधी शिक्षणासाठी, कधी नोकरीसाठी, कधी व्यवसायासाठी प्रत्येकाला पुण्यात राहण्याची संधी एकदा तरी मिळते. पुण्यातील स्वच्छ व समतोल वातावरणामुळे, सुसंस्कृत लोकांमुळे पुण्यात राहण्याला प्रत्येकाचीच पहिली पसंती असते आणि याचीच प्रचीती आली लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८’ या भव्य गृह प्रदर्शनात.


स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे या गृह प्रदर्शनाची शनिवारी (दि. १३) दिमाखात सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र जगताप, (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कंपनी लि.) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सिंडिकेट बँकेचे राम कण्णन (क्षेत्रीय प्रबंधक) उपस्थित होते. सिंडिकेट बँक या प्रदर्शनाचे बँकिंग पार्टनर आहेत. याप्रसंगी ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, जाहिरात महाव्यवस्थापक हरजित सिंग उपस्थित होते. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व ग्राहकांसाठी खुले राहील.

उद्या रविवारी (दि. १४) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. एकाच छताखाली पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा अशा संपूर्ण जिल्ह्यातील प्रथितयश व नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० पेक्षा जास्त गृह प्रकल्प या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पुणेकरांनी आपल्या स्वप्नातील घर निवडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी दसºयाच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करण्याच्या हेतूने या प्रदर्शनात नोंदणी करून हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले. प्रदर्शन स्थळापासून गृह प्रकल्पाच्या जागेपर्यंत बांधकाम व्यावसायिकांकडून ‘साईट व्हिजिट’ची सोय असल्याने अनेकांनी साईटवर प्रत्यक्ष जाऊन ‘सॅम्पल फ्लॅट’ पाहणे पसंत केले.


प्लॉट खरेदीचेही अनेक पर्याय असल्याने आपले बजेट, सोयी-सुविधा, अपेक्षांची पूर्तता करणारा गृह प्रकल्प निवडणे सोपे जात आहे. पुण्यात घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांसमोर अनेक पर्याय असतात; परंतु त्यामध्ये विश्वासार्हतेपासून आपल्या आवाक्यातील चांगल्यात चांगला पर्याय निवडण्यात अनेक अडचणी येतात.


या सर्व अडचणी ओळखूनच यंदा ‘लोकमत’ने महारेराअंतर्गतच नोंदविलेल्या गृह प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजिले आहे. गेल्या ७ वर्षांपासून ‘लोकमत’ प्रॉपर्टी शोकेसच्या माध्यमातून अनेक पुणेकरांना घरासाठी उत्तमातील उत्तम पर्याय मिळाला आहे.
त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या प्रदर्शनात पुणे शहर परिसरातील सर्व भागांत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेणे ग्राहकांना शक्य झाले आहे. वेगवेगळ्या भागांतील आपल्या बजेटमधील घरे पाहता आली.


या प्रदर्शनामध्ये वेळेची तर बचत होतेच; शिवाय बांधकाम व्यावसायिक आगामी काळात येणाºया सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक भरघोस सूट व फायदे असणाºया योजनांचा लाभ ग्राहकांना होतोे. यंदाच्या प्रदर्शनात बजेट होम्सपासून अगदी लक्झुरिअस होम्सपर्यंत, तर व्यावसायिक जागांपासून ते सध्याच्या युगात सेकंड होमच्या संकल्पनेवर आधारित ओपन बंगलो प्लॉटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यातील नेहमीच वाढणाºया व भविष्यात चांगला फायदा मिळवून देणारे प्रॉपर्टीचे अनेक पर्याय या भव्य गृह प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत आपल्या घराची नोंदणी केली.


दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून अनेकांनी रजिस्ट्रेशनचीही तयारी केली आहे. या प्रदर्शनाचे बॅँकिंग पार्टनर सिंडिकेट बॅँक असून, इच्छुक ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन तत्त्वत: गृहकर्ज मंजुरीपत्र ताबडतोब देण्याची व्यवस्था केली आहे.

Web Title: A glorious start of Lokmat Home Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.