‘गो ग्रीन’ला पुणेकरांकडून ‘खो’

By Admin | Published: June 12, 2016 06:03 AM2016-06-12T06:03:51+5:302016-06-12T06:03:51+5:30

‘महावितरण’चे वीजबिल आॅनलाइन भरण्यात राज्यात अव्वल असलेल्या पुणेकरांनीच ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ या पर्यावरणपूरक योजनेला ‘खो’ घातला आहे. वीजग्राहकांना कागदी बिल न पाठविता

'Go Green' to 'Lose' from Pune | ‘गो ग्रीन’ला पुणेकरांकडून ‘खो’

‘गो ग्रीन’ला पुणेकरांकडून ‘खो’

googlenewsNext

पुणे : ‘महावितरण’चे वीजबिल आॅनलाइन भरण्यात राज्यात अव्वल असलेल्या पुणेकरांनीच ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ या पर्यावरणपूरक योजनेला ‘खो’ घातला आहे. वीजग्राहकांना कागदी बिल न पाठविता, त्यांना दर महिन्याच्या बिलाची प्रत ई-मेलद्वारे पाठविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत अवघे ८३४ ग्राहकच ई-मेलद्वारे बिल स्वीकारत आहेत.
विशेष म्हणजे, ई-मेलद्वारे दर महिन्याचे बिल घेण्याचा पर्याय निवडल्यानंतर अशा ग्राहकांना वीज बिलात तीन रुपयांची सवलत दिली जात असतानाही त्याकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. शहरात जवळपास २३ लाख घरगुती वीजबिल ग्राहक आहेत. त्यातील आॅनलाइन बिल भरणारे तब्बल साडेपाच लाख वीजग्राहक आणि दुसऱ्या बाजूला आॅनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे बिल स्वीकारणारे अवघे ८३४ ग्राहक, असे विरोधाभासाचे चित्र पुणे विभागात दिसून येत आहे.

केवळ बिल आॅनलाइन बिल भरण्यासच पसंती
‘महावितरण’कडून ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल; तसेच इंटरनेटवरून बिल भरण्यासाठी दिलेल्या सुविधेत पुणे राज्यात अव्वल आहे. पुण्यात असलेल्या एकूण लघुदाब वीजग्राहकांपैकी तब्बल साडेपाच लाख ४५३ ग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरणा केलेला आहे. यावरून तंत्रज्ञान वापरात पुणेकर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
कोणताही संगणक वापरताना अथवा आॅनलाइन बिल भरणा करताना, अनेकदा
ई-मेल बंधनकारक असते. यावरून या ग्राहकांकडे ई-मेल असल्याचे स्पष्ट होते. ही बाब लक्षात घेता, या ग्राहकांनी ‘गो ग्रीन’च्या माध्यमातून वीजबिल आॅनलाइन घेतल्यास तब्बल ५ लाख बिलांचा कागद वाचणार असून, पर्यावरणास मोठी मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

काय आहे गो ग्रीन उपक्रम
ग्राहकसेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्राहकांच्या दैनंदिन जीवनशैलीला अनुरूप सोयी-सुविधा ‘महावितरण’कडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासोबत कागदनिर्मिर्तीसाठी होणारा पर्यावरणाचा ्नऱ्हास लक्षात घेऊन व पेपरलेस कार्यालयाच्या संकल्पनेनुसार ‘महावितरण’ने गो-ग्रीन उपक्रम सुरू केलेला आहे.
यात लघुदाब वीजग्राहकांना फक्त ई-मेलने वीजदेयक पाठविण्यात येते. त्यामुळे बिलाच्या छपाईसाठी लागणारा कागद; तसेच वाटपासाठी येणाऱ्या खर्चात बचत करता येते आणि पर्यावरण संवर्धनासही मदत होते. विशेष म्हणजे, ग्राहकाला बिल हवेच असल्यास ई-मेलद्वारे आलेल्या बिलाची प्रिंट काढून ग्राहक कोणत्याही बिल भरणा केंद्रावर बिल भरू शकतात; तसेच त्याची प्रतही स्वत:कडे ठेवू शकतात.
हा बिलाचा पर्यावरणपूरक पर्याय ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर आहे. त्यानुसार, एकदा संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केल्यानंतर, पुढे कायमस्वरूपी बिल ग्राहकास ई-मेल द्वारे मिळणार असून, ते मोबाईलवरही पाहणे शक्य आहे.

ई-मेलवर बिल घेण्याचे प्रमाण कमी असले, तरी आॅनलाइन वीजबिल भरणा करणाऱ्यांचे प्रमाण
लक्षणीय आहे, ही
बाब चांगली आहे.

वीजबिलाचा पर्यावरणपूरक पर्याय ‘महावितरण’च्या अधिकृत संकेतस्थळावर आहे.

ई-मेलद्वारे बिल घेणारे आॅनलाइन भरणा करणारे
रास्तापेठ मंडल३९९२ लाख ४६ हजार ४३६
गणेशखिंड मंडल३९३२ लाख ५५ हजार
पुणे ग्रामीण मंडल४२४० हजार ९७८


पर्यावरण संवर्धन; तसेच नागरिकांना अधिकाधिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी; तसेच कार्यालय पेपरलेस होण्यासाठी ही चांगली योजना असून, पुणेकरांनी त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. आॅनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकरांनी राज्यात पहिला क्रमांक पटकाविला असून, ‘गो ग्रीन’ योजनेला पुणेकर तेवढाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी यासाठी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा.
- रामराव मुंडे
(मुख्य अभियंता, पुणे विभाग)

Web Title: 'Go Green' to 'Lose' from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.