गवा घुटमळला गर्दीत : बावधनमध्ये दिवसभर वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:59+5:302020-12-23T04:07:59+5:30

पाषाण : पाषाण तलावाजवळ असलेल्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च सेंटर (एचईएमआरएल) या संरक्षण संस्थेलगतच्या झाडाझुडपांमध्ये मंगळवारी (दि. २२) पुन्हा ...

Goa Kneeling Crowd: Wandering all day in Bavdhan | गवा घुटमळला गर्दीत : बावधनमध्ये दिवसभर वावर

गवा घुटमळला गर्दीत : बावधनमध्ये दिवसभर वावर

Next

पाषाण : पाषाण तलावाजवळ असलेल्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च सेंटर (एचईएमआरएल) या संरक्षण संस्थेलगतच्या झाडाझुडपांमध्ये मंगळवारी (दि. २२) पुन्हा एकदा रानगवा आढळला. सकाळी आठच्या सुमारास या गव्याचे पहिले दर्शन झाले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत हा गवा त्याच परिसरात घुटमळत राहिला. जंगलात परतण्याचा मार्ग त्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वनविभाग आणि राज्य राखीव पोलिस बलाचे कर्मचारी हा गवा मानवी वस्तीकडे फिरकणार नाही याची खबरदारी घेत होते.

‘एचईएमआरएल’चा परिसर सुमारे नऊशे-हजार एकरांचा आहे. यातल्या बहुतांश भागात दाट झाडी आहे. मात्र गव्याला त्याच्या अधिवासात परतण्यासाठीचा मार्ग चिंचोळा असून तो मुंबई-बंगळुरू महामार्गालगत आहे. हा मार्ग गव्याला रात्री उशीरापर्यंत सापडलेला नव्हता. काही दिवसांपुर्वीच कोथरुड परिसरात आढळलेल्या रानगव्याला गर्दी आणि चुकीच्या औषध प्रयोगांमुळे जीव गमवावा लागल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आढळलेल्या रानगव्याला सुखरुप त्याच्या अधिवासात पोहचविण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. त्यामुळे मंगळवारी वनविभागाने गव्याला पकडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास एचईएमआरएलची संरक्षक भिंत आणि महामार्ग यांच्या दरम्यानच्या मोकळ्या जागेत स्थानिकांना रानगव्याचे दर्शन झाले. नागरिकांनी वनविभाग आणि पोलीसांना याची माहिती तातडीने दिली. त्यानंतर महामार्गालगत भाग संरक्षित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले. तसेच ‘रेस्क्यू टीम’लाही बोलावण्यात आले.

रानगवा पाषाण तलावाकडे जाऊ नये यासाठी तलावाच्या पुलाखाली जाळी व पत्रे लावून हा परिसर बंद करण्यात आला. यानंतर रानगवा त्याच्या नैसर्गिक वाटेने जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु बघ्यांच्या गर्दीमुळे आणि ‘रेस्क्यू’ करण्यासाठी आलेल्या अनअनुभ‌वी प्राणीमित्रांमुळे तो पुन्हा महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीकडे वळला.

यानंतर स्थानिक प्राणीमित्र आणि गोपालकांच्या मदतीने गव्याला त्याच्या वाटेवर धाडण्याचे प्रयत्न सुरु झाले. एचईएमआरएलच्या डोंगराजवळील संरक्षक भिंतीचे काम चालू असलेल्या ठिकाणावरून रानगवा पहिल्यांदा बाहेर आल्याचे असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. रानगवा ज्या ठिकाणावरून बाहेर आला होता त्या ठिकाणी त्याचे पायाचे निशाण देखील स्पष्ट आढळून आले.

चौकट

‘दिल्ली’तून हवी परवानगी?

रानगव्याला एचईएमआरएलच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाऊ द्यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यासाठी संरक्षण खात्याच्या परवानगीची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून गव्याला नैसर्गिक अधिवासात जाणे सोपे ठरेल, असा कयास आहे.

Web Title: Goa Kneeling Crowd: Wandering all day in Bavdhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.