लक्ष्य गाठण्यासाठी उडाली तारांबळ

By admin | Published: April 1, 2015 04:58 AM2015-04-01T04:58:47+5:302015-04-01T04:58:47+5:30

प्राप्तिकर आणि मिळकत कर भरण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची मोठी धांदल सुरू होती. दंड टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत बिल भरणा करण्यासाठी सर्वच जण

The goal was to hit the target | लक्ष्य गाठण्यासाठी उडाली तारांबळ

लक्ष्य गाठण्यासाठी उडाली तारांबळ

Next

पिंपरी : प्राप्तिकर आणि मिळकत कर भरण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची मोठी धांदल सुरू होती. दंड टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत बिल भरणा करण्यासाठी सर्वच जण
कार्यालय गाठत होते. वर्षभराचा व्यवहार पूर्ण करण्यात बॅँकेचे
कर्मचारी व्यस्त होते. दुसरीकडे वर्षाचा कोटा पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत मोठी वसुली केली.
आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते. यापूर्वी वर्षभरातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यावर सर्वांचा भर असतो. एक दिवस जरी विलंब झाला, तरी मोठा दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी सर्वांची काल सोमवारपासून लगबग सुरू होती. आज मंगळवारी तर कोणत्याही स्थितीत आयकर आणि मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी संबंधित कार्यालयात गर्दी केली होती.
आकुर्डीतील आयकर कार्यालयात उत्पन्न कर भरण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोकरदार, व्यावसायिकांची आणि करसल्लागारांची लगबग सुरू होती. यासाठी शहरातील विविध बॅँकांत स्वतंत्र खिडकीची सोय केली
होती. यामुळे रात्री ८पर्यंत काही
बॅँका खुल्या होत्या. तसेच,
अनेकांनी आॅनलाईन कर भरण्यासाठी इंटरनेटचा वापर केला.
मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातील कर संकलन विभागात नागरिकांची गर्दी होती. काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. दंड आणि
जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी कर भरण्यास पसंती दिली. ‘कर भरा आणि जप्ती टाळा,’ असे स्पिकरवर सांगत अखेरच्या दिवशी मंगळवारीही महापालिकेच्या रिक्षा शहरात फिरत होत्या.
वर्षभरातील व्यवहाराच्या नोंदी पूर्ण करण्याची धांदल बॅँक कर्मचाऱ्यांची सुरू होती. बॅँका खुल्या असूनही आज दैनंदिन व्यवहार झाले नाहीत. मात्र, अंतर्गत नोंदी आणि ताळेबंद पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे काम दिवसभर सुरू होते. त्यामुळे कार्यालयात काम सुरू असतानाही तणावपूर्ण शांतता दिसत होती. आपले व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी काही ग्राहक बॅँक व्यवस्थापकांकडे तगादा लावताना दिसत होते. बॅँक कर्मचारी व्यस्त असल्याने काही एटीएम केंद्रात रक्कम नसल्याचे चित्र शहरात दिसले. सलग सुट्यांमुळे नागरिकांनी एटीएममधून रक्कम काढल्याने केंद्रावर ताण वाढला. त्यामुळे मंगळवारी काही एटीएम केंद्रातील रक्कम सकाळीच संपली. त्यामुळे ती बंद होती. रक्कम काढण्यासाठी नागरिकांना केंद्र शोधण्याची वेळ आली. (प्रतिनिधी)

Web Title: The goal was to hit the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.