बिबट्याच्या हल्ल्यात बकरा व कालवड ठार, मुलगा थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:01+5:302021-08-24T04:16:01+5:30

आगरमळा येथील शेतकरी दीपक भानुदास लोंढे यांचा मुलगा श्रवण याने सकाळी बैल व कालवड चारण्यासाठी घराशेजारी असलेल्या शेतात आज ...

A goat and a calf were killed in a leopard attack, and the boy was rescued | बिबट्याच्या हल्ल्यात बकरा व कालवड ठार, मुलगा थोडक्यात बचावला

बिबट्याच्या हल्ल्यात बकरा व कालवड ठार, मुलगा थोडक्यात बचावला

Next

आगरमळा येथील शेतकरी दीपक भानुदास लोंढे यांचा मुलगा श्रवण याने सकाळी बैल व कालवड चारण्यासाठी घराशेजारी असलेल्या शेतात आज सकाळी बांधली होता. त्यानंतर तो पुन्हा घरी गेला व शेळी-बकऱ्यांसह चारण्यासाठी घेऊन जात असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला करत एक दहा महिन्यांचा बकरा ठार केला. नशीब बलवत्तर म्हणून श्रवणवर बिबट्याने हल्ला केला नाही. या घटनेच्या काही वेळापूर्वी दुसऱ्या बिबट्याने दीपक लोंढे यांच्या नऊ महिन्यांच्या कालवडीवर हल्ला केला, यामध्ये कालवड ठार झाली. त्यांनी शोध घेतला असता त्यांना मृत कालवड उसाच्या शेतात आढळली.

दरम्यान, आगरमळा परिसरात काही वेळेच्या अंतराने दोन हल्ले झाल्यामुळे नर व मादी असे दोन बिबटे असण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळे वन प्रवन परिक्षेत्राचे वनरक्षक सुर्वणा खुटेकर वनसेवक एस. बी. गायकर, शंकर मधे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या परिसरात त्वरित पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनरक्षक सुवर्णा खुटेकर यांनी सांगितले. तर या परिसरात बिबट्या दिसत असल्याने घबराटीचे वातावरण असल्याचे दीपक लोंढे यांनी सांगितले.

Web Title: A goat and a calf were killed in a leopard attack, and the boy was rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.